सूर्य-केतू युती झाल्यानं काही राशींना पैशाचे नुकसान आणि आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. पैशांचे व्यवहार फार काळजीपूर्वक करावे, अन्यथा पैसा अडकू शकतो. जाणून घेऊया अलर्ट मोडवर असलेल्या राशी कोणत्या आहेत.
advertisement
कुंभ - केतू आणि सूर्याची युती कुंभेच्या लोकांसाठी प्रतिकूल ठरू शकते. कारण ही युती कुंभ राशीत वैवाहिक जीवन आणि भागीदारीच्या घरात होत आहे. ज्यामुळे विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन वादावादीचं असू शकतं. रागात चुकीचं पाऊल उचलू नका. यावेळी कोणाशीही भागीदारीत काम सुरू करणे टाळावे. कुटुंबातील लोकांशी काही बाबींवर मतभेद होऊ शकतात. तसेच, यावेळी, तुम्हाला हृदयाशी संबंधित आजार वाढू शकतात, ज्यांना गंभीर आजार आहेत त्यांनी सावधगिरी बाळगावी.
मीन - केतू आणि सूर्याची युती मीन राशीच्या लोकांसाठी त्रासदायक ठरू शकते. कारण ही युती तुमच्या राशीपासून सहाव्या स्थानावर असेल. त्यामुळे, यावेळी तुम्ही न्यायालयीन प्रकरणांमध्ये सपशेल हरू शकता. तसेच, काही गुप्त शत्रू तुम्हाला त्रास देऊ शकतात. त्याचबरोबर तुम्हाला पोट आणि हृदयाशी संबंधित समस्या असू शकतात. तुम्ही वाहन काळजीपूर्वक चालवावे. कारण अपघात होण्याची शक्यता आहे. सध्या तुम्ही शनीच्या साडेसातीतून जात आहात. त्यामुळे, थोडे सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.
सिंह - केतू आणि सूर्याची युती सिंह राशीच्या लोकांसाठी हानिकारक ठरू शकते. कारण ही युती तुमच्या गोचर कुंडलीच्या पहिल्या भावात असेल. त्यामुळे कामात आत्मविश्वास राहणार नाही. समाजातील आदर कमी होईल. व्यवसायाच्या उद्देशाने प्रवास करण्याचा विचार करत असाल तर तो सध्यासाठी पुढे ढकलून द्या. कारण प्रवासादरम्यान अपघात होऊ शकतो. यावेळी, तुम्ही कोणालाही पैसे उधार देण्याचे टाळावे.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)