मुंबई : डिसेंबर महिना सुरू होऊन आठ दिवस उलटले असून, वर्ष 2025 चा हा अखेरचा महिना अनेकांसाठी निर्णायक ठरणार असल्याचे संकेत ज्योतिषशास्त्रातून मिळत आहेत. ग्रहांच्या स्थितीत झालेल्या विशेष बदलांमुळे पुढील 23 दिवस काही राशींच्या आयुष्यात सकारात्मक घडामोडी घडवून आणणार आहेत. या काळात आर्थिक स्थैर्य, करिअरमध्ये प्रगती, तसेच वैयक्तिक आयुष्यात समाधान मिळेल, असा अंदाज तज्ज्ञ ज्योतिषांकडून वर्तवला जात आहे.
advertisement
ज्योतिषशास्त्रानुसार 6 डिसेंबर रोजी शनि आणि शुक्र ग्रहांमध्ये एक दुर्मिळ असा त्रिदशंक योग तयार झाला आहे. हा योग 108 अंशांच्या विशेष कोनात निर्माण झाल्याने त्याला अत्यंत शुभ मानले जाते. सामान्यतः क्वचितच तयार होणारा हा योग, भाग्याचं दार उघडणारा मानला जातो. या योगाचा सर्वाधिक फायदा तीन विशिष्ट राशींना होणार असून, त्यांच्या आयुष्यात गेल्या काही काळापासून जाणवणारा अडथळ्यांचा काळ संपण्याची चिन्हे आहेत.
या काळात या राशींच्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. अचानक धनलाभ, व्यवसायात वाढ, नोकरीत चांगली संधी किंवा पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. मालमत्ता व्यवहार, वाहन खरेदी, गुंतवणूक यासाठीही हा काळ अनुकूल मानला जात आहे. मानसिक तणाव कमी होऊन आरोग्यही सुधारेल, असे ज्योतिषी सांगतात.
वृषभ राशी
वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत फलदायी ठरणार आहे. शनि-शुक्र योगामुळे तुमच्या परिश्रमांना योग्य दाद मिळेल. व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील आणि आर्थिक स्थिती बळकट होईल. नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या किंवा पदोन्नती मिळू शकते. प्रवासाशी संबंधित कामांतून लाभ होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि एखादे शुभकार्य पार पडण्याची शक्यता आहे. गुंतवणूक करायची असल्यास हा काळ योग्य मानला जातो.
मकर राशी
मकर राशीच्या लोकांसाठी त्रिदशंक योग यशाचा नवा मार्ग उघडणारा ठरेल. करिअर आणि व्यवसाय या दोन्ही क्षेत्रांत प्रगतीचे संकेत मिळत आहेत. प्रलंबित व्यवहार पूर्ण होतील. मोठा करार किंवा जबाबदारी स्वीकारण्याची संधी मिळू शकते. आर्थिक आवक वाढेल, त्यामुळे पैशाची चणचण जाणवणार नाही. वैवाहिक जीवनात सुसंवाद वाढेल. धार्मिक किंवा लांब पल्ल्याच्या प्रवासाचा योग आहे. परदेशात नोकरी किंवा शिक्षणाची संधी मिळण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.
मीन राशी
मीन राशीसाठी हा योग विशेष लाभदायक ठरणार आहे. मेहनतीचे फळ वेळेवर मिळेल आणि करिअरमध्ये मोठी झेप घेण्याची संधी मिळेल. नोकरीत पदोन्नती किंवा पगारवाढ होऊ शकते. उत्पन्नाचे एकापेक्षा अधिक स्रोत निर्माण होतील. जुने वाद, गैरसमज दूर होतील आणि कोर्ट-कचेरीशी संबंधित प्रकरणांमध्ये दिलासा मिळू शकतो. मानसिक शांती लाभेल आणि आत्मविश्वास वाढेल.
(सदर बातमी फक्त माहितीकरिता असून न्यूज 18 मराठी कुठलाही दावा करत नाही)
