मक्याचे दर स्थिर, कांद्यामध्ये पुन्हा घसरण, सोयाबीनला आज काय मिळाला भाव? Video

Last Updated:

9 डिसेंबर रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये शेतीमालाची आवक सोमवारच्या तुलनेत कमी झाली. कांदा, मका आणि सोयाबीनचे बाजारभाव जाणून घेऊ. 

+
News18

News18

अमरावती : राज्यातील कृषी मार्केटमध्ये शेतीमालाच्या दरांत सतत बदल होताना आपण बघत आहोत. 9 डिसेंबर मंगळवार रोजी राज्यातील सर्वच कृषी मार्केटमध्ये शेतमालाची आवक सोमवारच्या तुलनेत कमी झालेली दिसून येत आहे. त्यातील सोयाबीन, कांदा आणि मका या महत्त्वाच्या तीन शेतमालांची आवक आज कृषी मार्केटमध्ये कशी राहिली? आणि भाव किती मिळाला? याबाबत माहिती जाणून घेऊ.
मक्याचे दर स्थिर
कृषी मार्केट वेबसाईटवरील सायंकाळी 6.00 वाजताच्या रिपोर्टनुसार, 9 डिसेंबर रोजी राज्याच्या कृषी मार्केटमध्ये मक्याची एकूण आवक 36 हजार 011 क्विंटल इतकी झाली. यापैकी नाशिक मार्केटमध्ये 7 हजार 377 क्विंटल सर्वाधिक आवक झाली. त्यास प्रतीनुसार कमीत कमी 1483 ते जास्तीत जास्त 2073 रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला. तसेच मुंबई मार्केटमध्ये आवक झालेल्या 437 क्विंटल मक्यास सर्वसाधारण 2500 ते 3800 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला. सोमवारच्या तुलनेत मक्याच्या सर्वाधिक दरात कुठलाही बदल झालेला नाही. मक्याचे दर स्थिर आहेत.
advertisement
कांद्याची आवक कमी
राज्याच्या मार्केटमध्ये 86 हजार 055 क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली. यापैकी 36 हजार 985 क्विंटल सर्वाधिक आवक नाशिक बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार 375 ते 1791 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला. तसेच नाशिक मार्केटमध्ये आवक झालेल्या 5400 क्विंटल पोळ कांद्यास प्रतीनुसार 500 ते 4000 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला. सोमवारी मिळालेल्या कांद्याच्या दरात चढ उतार दिसून येत आहे.
advertisement
सोयाबीनच्या दरात चढ उतार
राज्याच्या मार्केटमध्ये 41 हजार 222 क्विंटल सोयाबीनची एकूण आवक झाली. वाशिम मार्केटमध्ये सर्वाधिक 10 हजार 850 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 4088 ते 4570 रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला. वाशिम मार्केटमध्ये आवक झालेल्या 3300 क्विंटल सोयाबीनला 5138 रुपये इतका सर्वाधिक बाजारभाव मिळाला. सोमवारी मिळालेल्या सर्वाधिक बाजारभावाच्या तुलनेत सोयाबीनच्या दरात काहीशी घट होऊन चढ उतार बघायला मिळत आहे.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
मक्याचे दर स्थिर, कांद्यामध्ये पुन्हा घसरण, सोयाबीनला आज काय मिळाला भाव? Video
Next Article
advertisement
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे प्रकरणावरून भाजप आमदाराला धमकी,  सभागृहात गदारोळ, मुख्यमंत्री म्हणाले...
तुकाराम मुंढे प्रकरणावरून भाजप आमदाराला धमकी, सभागृहात गदारोळ, मुख्यमंत्री म्हण
  • तुकाराम मुंढे प्रकरणावरून भाजप आमदाराला धमकी, सभागृहात गदारोळ, मुख्यमंत्री म्हण

  • तुकाराम मुंढे प्रकरणावरून भाजप आमदाराला धमकी, सभागृहात गदारोळ, मुख्यमंत्री म्हण

  • तुकाराम मुंढे प्रकरणावरून भाजप आमदाराला धमकी, सभागृहात गदारोळ, मुख्यमंत्री म्हण

View All
advertisement