मक्याचे दर स्थिर
कृषी मार्केट वेबसाईटवरील सायंकाळी 6.00 वाजताच्या रिपोर्टनुसार, 9 डिसेंबर रोजी राज्याच्या कृषी मार्केटमध्ये मक्याची एकूण आवक 36 हजार 011 क्विंटल इतकी झाली. यापैकी नाशिक मार्केटमध्ये 7 हजार 377 क्विंटल सर्वाधिक आवक झाली. त्यास प्रतीनुसार कमीत कमी 1483 ते जास्तीत जास्त 2073 रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला. तसेच मुंबई मार्केटमध्ये आवक झालेल्या 437 क्विंटल मक्यास सर्वसाधारण 2500 ते 3800 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला. सोमवारच्या तुलनेत मक्याच्या सर्वाधिक दरात कुठलाही बदल झालेला नाही. मक्याचे दर स्थिर आहेत.
advertisement
आंबिया बहारासाठी करा झाडे तयार, हिवाळ्यात असं करा संत्रा बागेचं पुनर्नियोजन, तज्ज्ञांचा सल्ला
कांद्याची आवक कमी
राज्याच्या मार्केटमध्ये 86 हजार 055 क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली. यापैकी 36 हजार 985 क्विंटल सर्वाधिक आवक नाशिक बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार 375 ते 1791 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला. तसेच नाशिक मार्केटमध्ये आवक झालेल्या 5400 क्विंटल पोळ कांद्यास प्रतीनुसार 500 ते 4000 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला. सोमवारी मिळालेल्या कांद्याच्या दरात चढ उतार दिसून येत आहे.
सोयाबीनच्या दरात चढ उतार
राज्याच्या मार्केटमध्ये 41 हजार 222 क्विंटल सोयाबीनची एकूण आवक झाली. वाशिम मार्केटमध्ये सर्वाधिक 10 हजार 850 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 4088 ते 4570 रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला. वाशिम मार्केटमध्ये आवक झालेल्या 3300 क्विंटल सोयाबीनला 5138 रुपये इतका सर्वाधिक बाजारभाव मिळाला. सोमवारी मिळालेल्या सर्वाधिक बाजारभावाच्या तुलनेत सोयाबीनच्या दरात काहीशी घट होऊन चढ उतार बघायला मिळत आहे.





