अयोध्या : वैदिक ज्योतिष शास्त्रात राहु केतुला छाया ग्रह मानले जाते. जातकाच्या कुंडलीत राहुचा प्रभाव जास्त असेल तर अनेक प्रकारच्या सुख सुविधा प्राप्त होतात. तर तेच दुसरीकडे राहुची स्थितीमध्ये अशुभ प्रभाव असेल तर व्यक्तीला अनेक प्रकारच्या संकटांचा सामना करावा लागतो.
ज्योतिष शास्त्रानुसार, राहुला क्रूर ग्रह मानले जाते. हा ग्रह नेहमी उल्टी चाल चालतो. शनि ग्रहानंतर राहु दुसरा असा ग्रह आहे जो एका राशीतून दुसऱ्या राशीत जायला खूप वेळ घेतो. जवळपास 18 महिने राहु ग्रह हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो.
advertisement
राहु ग्रहाने मागच्या वर्षी 30 ऑक्टोबर 2023 रोजी मंगळाची राशी मेष मधून निघून गुरूच्या मीन राशीत प्रवेश केला आहे. राहु ग्रह हा मीन राशीत 18 मे 2025 पर्यंत विराजमान असेल. यानंतर राहु शनिदेवाची राशी कुंभ राशीत गोचर करेल. राहु जेव्हाही राशी परिवर्तन करतो, तेव्हा त्याचा प्रभाव हा व्यक्तीच्या जीवनावर पडतो.
शनि जयंतीला आवर्जून करा ही 7 कामे, साडेसातीतून होईल सुटका, वर्षभर मिळेल शनिदेवाचा आशिर्वाद
राहु ग्रहाच्या राशी परिवर्तनामुळे व्यक्तीचे नशीब पालटू शकते. तर काही राशीच्या लोकांना संकटांचा सामनाही करावा लागू शकतो. त्यामुळे 2025 पर्यंत कोणत्या राशीच्या लोकांचे नशिब पालटणार आहे, हे आपण आज जाणून घेऊयात.
अयोध्येतील ज्योतिषी पंडित कल्कि राम यांनी याबाबत माहिती दिली. ज्योतिषीय गणनेत राहु ग्रहाला महत्त्वाचे स्थान आहे. राहु आता मीन राशीत आहे. याच राशीत राहू 2025 पर्यंत राहील. अशामध्ये तीन राशीच्या लोकांवर 2025 पर्यंत राहुची विशेष कृपा राहील. मिथुन, वृषभ आणि वृश्चिक राशीचा यामध्ये समावेश आहे.
वृश्चिक राशी : या राशीच्या लोकांसाठी हा कालावधी खूप चांगला असणार आहे. त्यांना नशिबाची साथ मिळेल. आर्थिक फायद्याचाही योग आहे. उत्पन्नात वाढ होईल. काही वर्षांपूर्वी जर कुणाला पैसे उधार दिले असतील तर ते पैसे परत मिळतील. कुटुंबात सामंजस्य राहील.
खूप सारा पैसा, प्रत्येक क्षेत्रात प्रगती, जून महिना हा या 3 राशींच्या लोकांसाठी Golden time
मिथुन राशी : मिथुन राशीच्या जातकांसाठी राहुचे मीन राशीत असणे हे खूप फायदेशीर राहणार आहे. व्यापारात वाढ होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. नोकरीमध्ये वरिष्ठांची साथ मिळेल. दाम्पत्य जीवनात मधुरता येईल. परदेशात ट्रिपसाठी जाऊ शकतात.
वृषभ राशी : या राशीच्या लोकांना खूप मोठा आर्थिक फायदा होणार आहे. प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. समाजात मान वाढेल. अडकलेले पैसे परत मिळतील. धार्मिक कार्यात रुची वाढेल. परदेश यात्रेचा योग तयार होईल.
सूचना : ही माहिती राशि-धर्म आणि शास्त्रांच्या आधारावर ज्योतिषाचार्य आणि आचार्यांशी संवाद करुन लिहिली गेली आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. हा वैयक्तिक सल्ला नाही. लोकल18 याबाबत कोणताही दावा करत नाही.