सिंह रास आणि इगो
सिंह राशीचा स्वामी 'सूर्य' आहे. ज्याप्रमाणे सूर्य कोणासमोर झुकत नाही, तसेच या राशीच्या लोकांचे असते. सिंह राशीच्या लोकांमध्ये उपजतच राजेशाही थाट आणि अहंकार असतो. प्रेमात ते खूप निष्ठावान असतात, पण जेव्हा माफी मागण्याची वेळ येते, तेव्हा त्यांचा 'Ego' आड येतो. त्यांना वाटते की माफी मागितल्याने त्यांचे वर्चस्व कमी होईल. जोडीदारानेच आधी पुढाकार घ्यावा, अशी त्यांची अपेक्षा असते.
advertisement
वृश्चिक रास आणि त्यांचं शांत बसणं
वृश्चिक राशीचा स्वामी 'मंगळ' आहे. हे लोक अत्यंत रहस्यमयी आणि तीव्र भावनांचे असतात. जर वृश्चिक राशीच्या व्यक्तीचे जोडीदाराशी भांडण झाले, तर ते माफी मागण्याऐवजी 'सायलेंट मोड'वर जातात. ते कित्येक दिवस शांत राहू शकतात पण झुकणार नाहीत. त्यांच्या मते, त्यांची कृती योग्यच होती. त्यांचा अबोला समोरच्या व्यक्तीला अधिक त्रासदायक ठरतो.
मकर रास आणि त्यांच लॉजिक
मकर राशीचा स्वामी 'शनी' आहे, जो शिस्त आणि नियमांचा कारक आहे. मकर राशीचे लोक प्रत्येक गोष्टीत 'लॉजिक' शोधतात. जर भांडण झाले, तर ते माफी मागण्याऐवजी गणित मांडतात की चूक कोणाची होती? त्यांना जर वाटले की त्यांची चूक केवळ 10 टक्के होती, तर ते कधीच माफी मागणार नाहीत. भावनेपेक्षा ते व्यवहाराला आणि तर्काला जास्त महत्त्व देतात.
कुंभ रास आणि त्यांची वेगळी विचारसरणी
कुंभ राशीचा स्वामी सुद्धा 'शनी' आहे, पण ही रास वायू तत्त्वाची आहे. या राशीचे लोक स्वतःला खूप बुद्धिमान समजतात. त्यांना वाटते की समोरच्याला त्यांची बाजू समजत नाहीये. ते माफी मागण्यापेक्षा त्या विषयावरून लक्ष भरकटवणे किंवा तो विषय सोडून देणे पसंत करतात. त्यांना वाटते की माफी मागण्याने काहीच साध्य होणार नाही, त्यापेक्षा परिस्थिती जशी आहे तशी स्वीकारलेली बरी.
मेष रास आणि त्यांचा वेगवान स्वभाव
मेष राशीचा स्वामी 'मंगळ' असून ही अग्नी तत्त्वाची रास आहे. मेष राशीचे लोक अत्यंत रागीट आणि उतावळे असतात. रागाच्या भरात ते जोडीदाराला खूप काही बोलून जातात, पण नंतर त्यांना आपली चूक उमजते. तरीही, त्यांच्यातील अग्नी तत्व त्यांना झुकू देत नाही. ते माफी मागण्याऐवजी असे वागतात की जणू काही घडलंच नाही. त्यांच्या मते, "जे झालं ते झालं, आता पुढे चला."
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
