TRENDING:

तुरीच्या दरात मोठी उलथापालथ, कापूस आणि सोयाबीनची काय स्थिती? Video

Last Updated:

13 जानेवारी रोज मंगळवारी राज्यातील कृषी मार्केटमध्ये काही पिकांच्या दरात किरकोळ चढ-उतार होत असतानाच आवकीतही बदल नोंदवण्यात आले. कपाशीच्या दरात किंचित वाढ दिसून आली असली तरी कांद्याचे दर स्थिर राहिले आहेत. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अमरावती : 13 जानेवारी, रोज मंगळवारी राज्यातील कृषी मार्केटमध्ये काही पिकांच्या दरात किरकोळ चढ-उतार होत असतानाच आवकीतही बदल नोंदवण्यात आले. कपाशीच्या दरात किंचित वाढ दिसून आली असली तरी कांद्याचे दर स्थिर राहिले आहेत. सोयाबीनच्या दरात सुधारणा झाली असून तुरीच्या दरात मात्र पुन्हा घसरण झाल्याचे चित्र आहे. प्रमुख शेतमालाची आवक किती झाली? भाव किती मिळाला? पाहुयात.
advertisement

कपाशीच्या दरात किंचित वाढ

कृषी मार्केट वेबसाईटवरील सायंकाळी 6.30 वाजताच्या रिपोर्टनुसार, आज राज्यातील कृषी मार्केटमध्ये कपाशीची एकूण आवक 19 हजार 754 क्विंटल इतकी झाली. 4 हजार 750 क्विंटल सर्वाधिक आवक वर्धा मार्केटमध्ये झाली. त्याठिकाणी कमीत कमी 7550 तर जास्तीत जास्त 8275 रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला. वर्धा मार्केटमध्ये आलेल्या लांब स्टेपल कपाशीला सर्वाधिक 8340 रुपये बाजारभाव मिळाला. सोमवारी मिळालेल्या सर्वाधिक दराच्या तुलनेत आज कपाशीच्या दरात किंचित घट झाली आहे.

advertisement

डाळिंबाचे भाव तेजीत, शेवगा आणि गुळाला काय मिळाला भाव? इथं चेक करा

कांद्याचे दर स्थिर

आज राज्यातील कृषी मार्केटमध्ये 2 लाख 07 हजार 363 क्विंटल कांद्याची आवक झाली. यातील नाशिक मार्केटमध्ये 1 लाख 17 हजार 190 क्विंटल लाल कांद्याची सर्वाधिक आवक झाली. त्याठिकाणी कांद्याला कमीतकमी 514 ते जास्तीत जास्त 1645 रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला. अमरावती मार्केटमध्ये आवक झालेल्या कांद्याला सर्वाधिक 2800 रुपये बाजारभाव मिळाला. सोमवारी मिळालेले सर्वाधिक दर आज स्थिर असल्याचे दिसून आले.

advertisement

सोयाबीनच्या दरात सुधारणा

आज राज्यातील कृषी मार्केटमध्ये एकूण 63 हजार 928 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज सोयाबीनची 17 हजार 588 क्विंटल सर्वाधिक आवक लातूर मार्केटमध्ये झाली. त्याठिकाणी सोयाबीनला कमीत कमी 4675 ते जास्तीत जास्त 5145 रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला. पिवळ्या सोयाबीनला 5918 रुपये सर्वाधिक बाजारभाव वाशिम मार्केटमध्ये मिळाला. सोमवारी मिळालेल्या सर्वाधिक दरात आज वाढ झालेली दिसून येत आहे.

advertisement

तुरीच्या दरात पुन्हा घट

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Tata चा धमाका, आता Wagon R विकून टाका! CNG मिनी SUV आणली!
सर्व पहा

आज राज्यातील कृषी मार्केटमध्ये एकूण 24 हजार 553 क्विंटल तुरीची आवक झाली. यापैकी जालना मार्केटमध्ये 7 हजार 249 क्विंटल पांढऱ्या तुरीची सर्वाधिक आवक नोंदवण्यात आली. त्याठिकाणी तुरीला 6075 ते 7240 रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला. तसेच जालना मार्केटमध्ये आलेल्या काळ्या तुरीला 8400 रुपये प्रतिक्विंटल असा सर्वाधिक बाजारभाव मिळाला. सोमवारी मिळालेल्या दराच्या तुलनेत आज तुरीच्या सर्वाधिक दरात पुन्हा घट झाली आहे.

advertisement

मराठी बातम्या/कृषी/
तुरीच्या दरात मोठी उलथापालथ, कापूस आणि सोयाबीनची काय स्थिती? Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल