मूलांक 2 - प्रेमाचा आणि शांतीचा आधार
ज्या मुलींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक 2 असतो. या मूलांकाचा स्वामी 'चंद्र' आहे. या मुली स्वभावाने अत्यंत शांत, समजूतदार आणि भावनिक असतात. त्या आपल्या पतीच्या प्रत्येक निर्णयाला खंबीरपणे साथ देतात. त्यांच्या संयमी स्वभावामुळे घरातील वातावरण आनंदी राहते, ज्यामुळे पतीला आपल्या कामावर अधिक चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित करता येते. त्यांच्या आगमनानंतर पतीच्या आयुष्यात मानसिक स्थिरता येते, जी यशासाठी महत्त्वाची असते.
advertisement
मूलांक 3 - बुद्धिमत्ता आणि मार्गदर्शनाचा स्त्रोत
ज्या मुलींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक 3 असतो. या मूलांकाचा स्वामी 'गुरु' (बृहस्पती) आहे. गुरु हा ज्ञानाचा कारक आहे. मूलांक ३ असलेल्या मुली अतिशय हुशार आणि विचारी असतात. त्या पतीसाठी केवळ पत्नीच नाही, तर एक उत्तम 'सल्लागार' ठरतात. आर्थिक नियोजनात त्या पटाईत असतात. लग्नानंतर अशा मुलींच्या पतीला नोकरी किंवा व्यवसायात अनपेक्षित लाभ मिळतात आणि समाजात प्रतिष्ठा वाढते.
मूलांक 6 - सुख-समृद्धी आणि वैभवाची जननी
ज्या मुलींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15 किंवा 24 तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक 6 असतो. या मूलांकाचा स्वामी 'शुक्र' आहे. शुक्र हा ऐश्वर्य, प्रेम आणि चैनीचा कारक आहे. मूलांक 6 असलेल्या मुलींना 'लक्ष्मी'चे रूप मानले जाते. त्या सासरी पाऊल ठेवताच पतीच्या बंद नशिबाची कुलूपे उघडतात. अशा मुलींना लक्झरी लाइफ आवडते आणि त्यांच्या भाग्याने पतीलाही सर्व भौतिक सुखे मिळतात. या मुली पतीच्या आयुष्यात धनदौलत आणि रोमान्स दोन्ही टिकवून ठेवतात.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
