शेतकऱ्यांनो, शेतात करा गार AC मध्ये काम, चक्क ट्रॅक्टरला बसवला एसी, किती आला खर्च? Video
- Reported by:Patel Irfan Hassan
- Published by:Mohan Najan
Last Updated:
एका ट्रॅक्टर कंपनीने चक्क ट्रॅक्टरमध्ये शेतकऱ्यांसाठी एसी बसवला आहे. भारतातील शेतकऱ्यांसाठी या कंपनीने पहिला एसी ट्रॅक्टर बनवला आहे.
सोलापूर : सोलापूर शहरातील केगाव येथील एका ट्रॅक्टर कंपनीने चक्क ट्रॅक्टरमध्ये शेतकऱ्यांसाठी एसी बसवला आहे. भारतातील शेतकऱ्यांसाठी या कंपनीने पहिला एसी ट्रॅक्टर बनवला आहे. हा एसी लावण्यासाठी 50 हजार खर्च आला आहे. त्या ट्रॅक्टर संदर्भात अधिक माहिती नितीन शिंदे यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.
सोलापूर शहरातील देगाव येथील ट्रॅक्टर कंपनीने सोलापुरातील उन्हाळा पाहता एक आगळावेगळा ट्रॅक्टर बनवला आहे. तो म्हणजे या ट्रॅक्टरमध्ये एसी बसवण्यात आला आहे. हा ट्रॅक्टर 65 एचपीचा आहे. तसेच 75 आणि 130 एचपीचा सुद्धा ट्रॅक्टर विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्या ट्रॅक्टरमध्ये शेतकऱ्यांना ऊन, वारा आणि पाऊस लागत नाही.
advertisement
या ट्रॅक्टरमध्ये एसी असल्याने जवळपास आठ ते दहा तास शेतकरी आरामात काम करू शकतो. शेतीची कामे करत असताना उन्हामुळे ट्रॅक्टरच्या आतमध्ये खूप गरम होत होतं. तर काही शेतकरी म्हणायचे की कारमध्ये एसी आहे पण ट्रॅक्टरमध्ये का नाही. शेतकऱ्यांच्या मागणीला अनुसरून या कंपनीने हा ट्रॅक्टर बनवला आहे.
तसेच या ट्रॅक्टरमध्ये आधुनिक अवजारे देखील बसवण्यात आले आहेत. तसेच या ट्रॅक्टरला नांगर, रोटर मशीन, मुरघास मशीन, तसेच भविष्यात येणारे अवजारे देखील या ट्रॅक्टरला जोडता येतील अशा पद्धतीने हा ट्रॅक्टर बनवण्यात आला आहे. कंपनीने बनवलेल्या नवीन ट्रॅक्टरमुळे शेतकऱ्यांना नांगरणीचं काम सोपं होणार असून उन्हाच्या झळा देखील नसल्याचे मत नितीन शिंदे यांनी व्यक्त केले आहे.
view commentsLocation :
Solapur,Maharashtra
First Published :
Jan 10, 2026 9:35 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
शेतकऱ्यांनो, शेतात करा गार AC मध्ये काम, चक्क ट्रॅक्टरला बसवला एसी, किती आला खर्च? Video








