advertisement

APMC Market Rate : शेवग्याच्या दरात तेजी कायम, गुळ आणि डाळिंबास काय मिळाला भाव? इथं चेक करा

Last Updated:

राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ.

+
News18

News18

मुंबई: शनिवार, दिनांक 10 जानेवारी 2026 रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या तीन शेतमालांमध्ये गूळ, शेवगा आणि डाळिंबाची आवक आणि भाव पाहू.
गुळास चांगला उठाव
राज्याच्या मार्केटमध्ये आज एकूण 2236 क्विंटल गुळाची आवक झाली. यापैकी सांगली मार्केटमध्ये 1205 क्विंटल सर्वाधिक आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 3350 ते 4355 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच पुणे मार्केटमध्ये आवक झालेल्या 419 क्विंटल गुळास 4400 रुपये सर्वाधिक सर्वसाधारण बाजारभाव मिळाला.
advertisement
शेवग्याच्या आवकेत घट
राज्याच्या मार्केटमध्ये आज 63 क्विंटल शेवग्याची आवक झाली. यापैकी पुणे मार्केटमध्ये सर्वाधिक 33 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 11000 ते 18500 रुपये दरम्यान बाजारभाव मिळाला. तसेच पुणे मार्केटमध्ये आवक झालेल्या 3 क्विंटल शेवग्यास 25000 रुपये सर्वात जास्त बाजारभाव मिळाला.
डाळिंबाचे भाव
आज राज्याच्या मार्केटमध्ये 329 क्विंटल डाळिंबाची एकूण आवक झाली. यापैकी 120 क्विंटल सर्वाधिक आवक नागपूर मार्केटमध्ये राहिली. त्यास सर्वसाधारण 5250 रुपये सर्वात कमी बाजारभाव मिळाला. तसेच अमरावती मार्केटमध्ये आवक झालेल्या 63 क्विंटल डाळिंबास प्रतीनुसार 10000 ते 12000 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
APMC Market Rate : शेवग्याच्या दरात तेजी कायम, गुळ आणि डाळिंबास काय मिळाला भाव? इथं चेक करा
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement