TRENDING:

तुम्हाला सुखी जीवनासह बक्कळ पैसा हवा आहे का? सूर्यग्रहणाच्या दिवशी 3 कामे नक्की करा

Last Updated:

Astrology News : सन 2025 मधील दुसरे सूर्यग्रहण येत्या 21 सप्टेंबर रोजी होणार आहे. विशेष म्हणजे, या दिवशीच सर्वपित्री अमावस्या देखील आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Surya Grahan 2025
Surya Grahan 2025
advertisement

मुंबई : सन 2025 मधील दुसरे सूर्यग्रहण येत्या 21 सप्टेंबर रोजी होणार आहे. विशेष म्हणजे, या दिवशीच सर्वपित्री अमावस्या देखील आहे. यावेळी सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे भारतात ग्रहणसूचक काळ (सूतक) लागू होणार नाही. तरीसुद्धा, धार्मिक आणि आध्यात्मिक परंपरेनुसार या दिवशी काही खास उपाय करणं आणि सावधानता बाळगणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं.

advertisement

राहू-केतूचा प्रभाव

पौराणिक मान्यतेनुसार, प्रत्येक ग्रहणकाळात राहू आणि केतूचा प्रभाव विशेषत्वाने जाणवतो. सूर्यग्रहणाच्या दिवशी हे ग्रह सक्रिय असल्याने त्यांच्या अशुभ परिणामांपासून मुक्ती मिळवण्यासाठी काही उपाय सुचविलेले आहेत. श्रद्धा आणि विश्वासानुसार हे उपाय केल्यास मानसिक शांती लाभते, असे मानले जाते.

advertisement

सूर्यग्रहणानंतरचे स्नान व दान

ग्रहण संपल्यानंतर पवित्र नदीत स्नान करणं पुण्यदायी ठरतं. ज्या लोकांना नदीत स्नान करणं शक्य नसेल त्यांनी घरी पाण्यात गंगाजल मिसळून स्नान करावं. स्नानानंतर आपल्या सामर्थ्यानुसार गरीबांना अन्नधान्य किंवा वस्त्र दान करणं उत्तम मानलं जातं. जसे की, चणे, गहू, तांदूळ, डाळी, गूळ, लाल रंगाचे कपडे इतर आवश्यक वस्तू. अशा वस्तूंचे दान केल्याने राहू-केतूच्या नकारात्मक प्रभावांपासून संरक्षण मिळते, अशी श्रद्धा आहे.

advertisement

तुळशीचे उपाय

ग्रहणकाळात वातावरणात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो, असे मानले जाते. अशावेळी तुळशीचे विशेष महत्त्व आहे. ग्रहणाच्या दिवशी घरातील खाण्या-पिण्याच्या पदार्थांमध्ये तुळशीची पाने टाकल्यास ते अपवित्र ठरत नाहीत. हा उपाय घरातील शुद्धता आणि सकारात्मकता टिकवण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो.

मंत्रजप आणि ध्यान

ग्रहणकाळात नियमित पूजाविधी टाळावे असे सांगितले जाते. मात्र, या वेळेत भगवान विष्णूचे स्मरण करणे, ध्यानधारणा करणे व मंत्रजप करणे अत्यंत लाभदायी ठरते. विशेषतः महामृत्युंजय मंत्र जपल्याने मनःशांती मिळते व आरोग्यसुधारणा होते, असे धार्मिक ग्रंथांमध्ये नमूद आहे. तसेच, "ॐ नमो भगवते वासुदेवाय" सारखा मंत्र जपणेही मंगलकारी मानले जाते.

advertisement

दरम्यान, 21 सप्टेंबर 2025 रोजी होणारे सूर्यग्रहण भारतात दिसणार नसले तरीही, याचा धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून मोठा महत्त्व आहे. सूतक लागू नसल्याने सामान्य पूजाविधी किंवा दैनंदिन कार्यात अडथळा येणार नाही. तरीदेखील, श्रद्धेनुसार स्नान, दान, तुळशीचा उपयोग, मंत्रजप आणि ध्यान केल्यास मानसिक समाधान व सकारात्मक ऊर्जा लाभते.

(सदर बातमी फक्त माहितीकरिता असून न्यूज 18 मराठी कुठलाही दावा करत नाही)

मराठी बातम्या/राशीभविष्य/
तुम्हाला सुखी जीवनासह बक्कळ पैसा हवा आहे का? सूर्यग्रहणाच्या दिवशी 3 कामे नक्की करा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल