TRENDING:

आजचं राशिभविष्य - 23 मे 2024: तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल

Last Updated:

Rashi Bhavishya In Marathi: कसा असेल आजचा दिवस, कोणाला कशातून होईल लाभ? कोणाला कोणत्या समस्या देतील त्रास, कोणत्या गोष्टींची घ्यावी लागेल काळजी. पहा आजचं दैनिक राशीभविष्य ( 23 मे 2024)

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
।। श्री गणेशाय नम:।।
राशिभविष्य
राशिभविष्य
advertisement

मेष (Aries) : श्री गणेश सांगतात, मालमत्तेसाठी दिवस चांगला आहे. मालमत्ता संपादन करू शकाल. तसेच म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकता. तुम्हाला तब्येतीविषयी तक्रार जाणवत असेल, तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुमचे तुमच्या आईशी वाद होतील. पण त्यावेळी तुम्ही गप्प रहा. व्यवसायासाठी भावांसोबत काही योजना आखण्याचा विचार कराल. आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक हाताळा.

advertisement

Lucky Color : Magenta

Lucky Number : 12

वृषभ (Taurus) : श्री गणेश सांगतात, दिवस फलदायी आहे. रचनात्मक कार्यात यश मिळेल. व्यवसायवृध्दीसाठी काही योजना आखल्यास फायदेशीर ठरू शकते. जोखमीचं काम करणं टाळा. मित्र आणि कुटुंबातील सदस्यांसह सहलीला जाण्याचं किंवा पार्टी करण्याचं प्लॅनिंग कराल. एखादं काम घाईत केलं तर त्यावरून वाद होऊ शकतात. पाठदुखी, पोटदुखी आदी समस्या त्रस्त करू शकतात.

advertisement

Lucky Color : Yellow

Lucky Number : 8

या दिवशी शनिदेव होतील प्रसन्न, साडेसातीच्या त्रासापासून सुटका, या राशीच्या लोकांनी करा हे उपाय

मिथुन (Gemini) : श्री गणेश सांगतात, दिवस धकाधकीचा असेल. कुटुंबातील सदस्यांसह सहलीला जाण्याची योजना आखाल. रखडलेली कामं पूर्ण करण्यासाठी बराच वेळ द्याल. महागड्या वस्तू खरेदी करणं टाळा. जमा बॅलन्स विचारात घेत खरेदी करा. घरात पेंटिंग किंवा सजावटीचा विचार असेल, तर ते काम आजच पूर्ण करा. व्यवसायात नफ्याच्या संधी मिळाल्याने रोजचा खर्च भागवू शकाल.

advertisement

Lucky Color : Pink

Lucky Number : 1

कर्क (Cancer) : श्री गणेश सांगतात, कुटुंबातील कलह चिंतेचं कारण ठरेल. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला सहकार्य मिळू शकेल. मुलाच्या शिक्षणासंबंधी कामासाठी प्रवास करावा लागेल. पण हा प्रवास तुम्हाला थकवणारा असेल. खाण्याच्या सवयींवर लक्ष द्या. विद्यार्थ्यांना एखाद्या परीक्षेसाठी अर्ज करायचा असेल तर ते करू शकतात. परदेशात नोकरी करण्याची इच्छा असलेल्या व्यक्तींना एखादी चांगली बातमी समजेल.

advertisement

Lucky Color : Blue

Lucky Number : 11

सिंह (Leo) : श्री गणेश सांगतात, तुमचा सन्मान वाढेल. कुटुंबातील लहान मुलांसोबत मौजमजा कराल. त्यामुळे तुमचा मानसिक ताण कमी होईल. सामाजिक कार्यासाठी प्रोत्साहन मिळेल. या कामामुळे तुमचा आदर वाढेल. सहकाऱ्यांना भेटण्याची संधी मिळेल. पैसे गुंतवताना सावधगिरी बाळगली तर योग्य निर्णय घेऊ शकाल, अन्यथा पैसे बुडू शकतात. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या विवाहाच्या प्रस्तावाला मान्यता मिळू शकते.

Lucky Color : Black

Lucky Number : 7

कन्या (Virgo) : श्री गणेश सांगतात, व्यवसायासाठी एखादा बहुप्रतिक्षित फायदेशीर सौदा मिळेल. मोठं कामं हाती घेताना संकोच करू नका, पण विचार नक्की करा. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींनी एखादा सल्ला दिला तर त्याचे पालन करा. लव्ह लाईफमध्ये तुम्ही तुमच्या जोडीदाराची ओळख कुटुंबातील सदस्यांशी करून द्याल. विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. नवीन कपडे, दागिने आदी वस्तू खरेदी करू शकता.

Lucky Color : Green

Lucky Number : 2

तूळ (Libra) : श्री गणेश सांगतात, आरोग्याच्या दृष्टीने दिवस फारसा चांगला नाही. त्यामुळे तुम्हाला नियोजित प्रवास पुढे ढकलावा लागेल. ऑफिसमध्ये कोणीतरी तुम्हाला डिवचण्याचा प्रयत्न करेल. कोणाचं ऐकून वाद घालणं टाळा. मित्राच्या पाठिंब्यामुळे मोठी समस्या सहज सोडवू शकाल. कोणत्याही वादात अडकला तर तुमचं काम बिघडू शकते. त्यामुळे तुम्ही तणावात राहाल. तुम्ही तुमच्या समस्यांबाबत भावांशी संवाद साधावा.

Lucky Color : Maroon

Lucky Number : 10

वृश्चिक (Scorpio) : श्री गणेश सांगतात, दिवस सामान्य असेल. जोडीदाराच्या पाठिंब्यामुळे मोठं काम पूर्ण कराल आणि तुम्हाला त्याचे फायदे देखील मिळतील. कुटुंबातील सदस्याकडून एखादी चांगली बातमी समजेल. व्यवसायात तोटा गमावलेले पैसे प्रयत्नांनंतर परत मिळवाल. राजकीय क्षेत्रात नशीब आजमावण्याचा विचार कराल. कुटुंबातील सदस्यांशी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा कराल. घरातील सदस्याची तब्येत बिघडल्याने चिंतेत असाल.

Lucky Color : Gray

Lucky Number : 6

धनू (Sagittarius) : श्री गणेश सांगतात, दिवस अनुकूल आहे. बुद्धिच्या जोरावर व्यवसायात काही योजना राबवाल. यातून तुम्हाला फायदा मिळेल. मित्रांसोबत बाहेर फिरायला जाण्याचे प्लॅनिंग करू शकता. नवीन वस्तू खरेदी करायला जाणार असाल तर जोडीदाराला सोबत न्या. मुलांच्या चांगल्या भविष्याबाबत विचार कराल. सासरच्या व्यक्तींकडून आदर मिळेल. पण कोणाच्याही प्रभावाखाली निर्णय घेऊ नका, अन्यथा पुढे अडचणी निर्माण होतील.

Lucky Color : Purple

Lucky Number : 3

समृद्ध जीवनासाठी करा स्नानाचे हे उपाय, स्नानाचे 4 प्रकार आणि सर्वोत्तम वेळ

मकर (Capricorn) : श्री गणेश सांगतात, दिवस फायदेशीर आहे. धार्मिक कार्याची आवड निर्माण होईल. कुटुंबातील सदस्य आनंदी असतील. कुटुंबात एखाद्या सदस्याला सरकारी नोकरी मिळाल्याने घरात उत्साही वातावरण असेल. सामाजिक समारंभाला गेला तर बोलण्यात समतोलपणा ठेवा. कोणाशीही वाद घालणं टाळा. कामाच्या ठिकाणी विरोधक मजबूत असतील. ते तुम्हाला त्रास देण्यात व्यस्त राहतील. त्यामुळे सावध राहा. बहीणभावाच्या नात्यातील मतभेद संपतील.

Lucky Color : Cream

Lucky Number : 5

कुंभ (Aquarius) : श्री गणेश सांगतात, कोणतंही काम घाईत किंवा निष्काळजीपणाने करू नका, अन्यथा ते तुम्हाला महागात पडेल. त्यामुळे सतर्क रहा. प्रवासाला जायची तयारी असेल तर प्लॅन काही काळ पुढे ढकला. कारण अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. ऑफिसमध्ये सावधगिरी बाळगा. कारण लोक तुमच्या बोलण्याची खिल्ली उडवू शकतात. मित्र आणि नातेवाईकांकडून सहकार्य मिळेल. जोडीदारावर असलेला राग निवळून जाईल. विद्यार्थ्यांनी शिक्षणातील समस्यांवर त्यांच्या वडिलांचा सल्ला घ्यावा.

Lucky Color : Brown

Lucky Number : 9

मीन (Pisces) : श्री गणेश सांगतात, घर किंवा बाहेरील कोणतीही समस्या बुध्दिचा वापर करून सोडवा. तुम्ही नातेवाईकांकडे मदत मागितल्यास ते तुम्हाला चुकीचा मार्ग दाखवू शकतात. मित्रांसोबत बाहेर फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर त्या पूर्वी वडिलांचा सल्ला घ्या. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. व्यवसायात अडचणी आल्या तर त्या सहज सुटतील.

Lucky Color : White

Lucky Number : 4

मराठी बातम्या/राशीभविष्य/
आजचं राशिभविष्य - 23 मे 2024: तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल