TRENDING:

Vasant Panchami 2026: विद्येची देवता मुला-बाळांवर प्रसन्न होईल; वसंत पंचमीला घरी काय-काय करतात, विधी- धार्मिक महत्त्व

Last Updated:

Vasant Panchami 2026: यावर्षीची वसंत पंचमी अतिशय खास आहे, कारण या दिवशी 4 अत्यंत शुभ योगांची निर्मिती होत आहे. सर्वार्थ सिद्धी योग, रवि योग, शिव योग आणि महासिद्धी योग अशा शुभ संयोगात सरस्वती पूजन पार पडणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : शुक्रवार दिनांक 23 जानेवारी रोजी वसंत पंचमीचा सण साजरा केला जाणार आहे. हा दिवस विद्या, बुद्धी आणि कलेची देवता माता सरस्वती हिच्या पूजनासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. यावर्षीची वसंत पंचमी अतिशय खास आहे, कारण या दिवशी 4 अत्यंत शुभ योगांची निर्मिती होत आहे. सर्वार्थ सिद्धी योग, रवि योग, शिव योग आणि महासिद्धी योग अशा शुभ संयोगात सरस्वती पूजन पार पडणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार या योगांमध्ये केलेली साधना विशेष फलदायी ठरते.
News18
News18
advertisement

वसंत पंचमीला जुळून येणारे खास योग

23 जानेवारी रोजी सूर्योदय सकाळी 6 वाजून 38 मिनिटांनी होईल. माघ शुक्ल पंचमी तिथी दिवसभर असून ती रात्री 12 वाजून 8 मिनिटांपर्यंत प्रभावी राहील. सर्वार्थ सिद्धी योग संपूर्ण दिवस आणि रात्रभर असेल, तर सकाळी 9 वाजून 14 मिनिटांनंतर महासिद्धी योगाची सुरुवात होईल. धार्मिक मान्यतेनुसार ज्या दिवशी पंचमी तिथीचा पूर्वाह्न काळ असतो, त्याच दिवशी वसंत पंचमी साजरी केली जाते. यामुळेच यावर्षी शुक्रवारीच हा उत्सव साजरा होईल.

advertisement

माता सरस्वतीच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त

वसंत पंचमी तिथीची सुरुवात 22 जानेवारी, गुरुवारच्या रात्री 1 वाजून 30 मिनिटांपासून होईल, जी 23 जानेवारीच्या रात्री 12 वाजून 22 मिनिटांपर्यंत राहील. उदय तिथीनुसार शुक्रवारीच सरस्वती पूजन करणे शास्त्रशुद्ध मानले गेले आहे. 

वसंत पंचमीला घातक विषयोगाची बाधा; 3 राशींवर दु:खाचा डोंगर, मोठे नुकसान

advertisement

पूजेसाठी या दिवशी अनेक विशेष मुहूर्त उपलब्ध आहेत. पहिला मुख्य शुभ मुहूर्त सकाळी 7 वाजून 13 मिनिटांपासून ते दुपारी 12 वाजून 33 मिनिटांपर्यंत असेल. या व्यतिरिक्त अभिजित मुहूर्त दुपारी 12 वाजून 11 मिनिटांपासून ते 12 वाजून 54 मिनिटांपर्यंत राहील. अमृतकाल मुहूर्त सकाळी 9 वाजून 31 मिनिटांपासून ते 11 वाजून 5 मिनिटांपर्यंत असणार आहे. अशा शुभ मुहूर्तांवर पूजा केल्याने बुद्धी, सुख आणि समृद्धीची प्राप्ती होते, अशी श्रद्धा आहे.  

advertisement

लहान मुलांच्या शिक्षणाची सुरुवात करण्यासाठी हा दिवस सर्वोत्तम आहे. या दिवशी मुलांच्या हातून पाटीवर किंवा तांदळाने भरलेल्या ताटात सोन्याच्या अंगठीने किंवा डाळिंबाच्या काडीने 'ॐ' (ओम) किंवा 'श्री' हे अक्षर गिरवून घ्यावे. 'ॐ' हे विश्वाचे आणि ज्ञानाचे मूळ अक्षर मानले जाते, तर 'श्री' हे समृद्धीचे प्रतीक आहे. असे केल्याने मुलांची एकाग्रता वाढते आणि त्यांच्यावर माता सरस्वतीची कृपा सदैव राहते, असे मानले जाते.

advertisement

या दिवशी मुलांच्या अभ्यासाच्या टेबलावर किंवा पुस्तकांमध्ये मोरपंख ठेवणे खूप लाभदायक ठरते. तसेच पूजेच्या वेळी माता सरस्वतीला पिवळ्या रंगाची फुले आणि केशरयुक्त भात अर्पण करावा. मुलांच्या लेखणीची (पेन किंवा पेन्सिल) देखील या दिवशी पूजा करावी. यामुळे अभ्यासातील नकारात्मकता दूर होऊन स्मरणशक्ती तल्लख होण्यास मदत होते.

टेन्शन सोडा, इतक्या सहज होणार काम; मकर संक्रातीच्या आधीच या राशींना शुभवार्ता

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पावभाजी ते अंडा राईस, फक्त 30 रुपयांपासून,पुण्यात इथं असते खाण्यासाठी मोठी गर्दी
सर्व पहा

(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या/राशीभविष्य/
Vasant Panchami 2026: विद्येची देवता मुला-बाळांवर प्रसन्न होईल; वसंत पंचमीला घरी काय-काय करतात, विधी- धार्मिक महत्त्व
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल