वास्तुशास्त्रानुसार, घराचे छत नेहमीच स्वच्छ ठेवले पाहिजे. ज्याप्रमाणे आपण आपले घर दररोज स्वच्छ करतो, त्याचप्रमाणे आपण आपले छत देखील स्वच्छ ठेवले पाहिजे. कोणत्याही प्रकारचा कचरा, मोडकी-तुटकी भांडी, जुने टायर, खराब फर्निचर, तुटलेल्या प्लास्टिकच्या वस्तू किंवा काही निरुपयोगी वस्तू छतावर टाकल्या जातात, त्यानं घरात नकारात्मक ऊर्जा येऊ शकते. या नकारात्मक शक्ती घरातील प्रत्येकाला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या त्रास देतात. छतावर कचरा किंवा वस्तू ठेवल्यानं एखाद्या व्यक्तीला आर्थिक समस्या आणि आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो.
advertisement
छतावर लोखंडी वस्तू ठेवल्यानं - आपल्यापैकी बहुतेक जण छतावर अधूनमधून वापरल्या जाणाऱ्या किंवा खराब झालेल्या लोखंडी वस्तू वर्षानुवर्षे ठेवतात. वास्तुशास्त्रानुसार, कोणत्याही प्रकारच्या लोखंडी वस्तू, यंत्रसामग्रीचे भाग किंवा तुटलेल्या लोखंडी वस्तू छतावर ठेवल्याने व्यक्तीची प्रगती थांबते. त्याला आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. यासोबतच, त्याचा त्याच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो.
कमाईचा काळ सुरू! सलग 70 दिवस या राशींचा इनकम वाढणार; बुधामुळे भाग्योदयाचे योग
टेरेसवर अनेकजण कुंड्या ठेवतात, पण त्यावर काटेरी झाडे लावणं टाळायला हवं. वास्तुशास्त्रानुसार, छतावर काटेरी किंवा सुकलेली रोपे लावल्यानं घराच्या उर्जेवर त्याचा परिणाम होतो. छतावर अशी रोपं लावल्यानं एखाद्या व्यक्तीला वारंवार अडचणींना तोंड द्यावे लागू शकते. यासोबतच आर्थिक समस्याही वाढू शकतात.
टेरेसचा वास्तुदोष दूर करण्यासाठी काय करावं?
छताचा वास्तुदोष दूर करण्यासाठी, छताची नियमित स्वच्छता आणि व्यवस्था करत रहा. छतावर कोणत्याही प्रकारच्या तुटलेल्या वस्तू ठेवू नका. छतावर पाणी साचू देऊ नका. तसेच छताला पुरेसा सूर्यप्रकाश मिळणं उत्तम मानलं जातं.
घराचं ब्रह्मस्थान कुठं असतं? तेवढीच जागा रिकामी सोडल्यानं इतके फायदे मिळतात
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)