देव्हाऱ्यात आगपेटी ठेवणं अयोग्य - वास्तुशास्त्रानुसार, घरातील देव्हाऱ्यात आगपेटी ठेवणे निषिद्ध मानले जाते. असे केल्याने अनेक प्रकारचे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात. देव्हारा हा आपल्या घरातील सर्वात पवित्र स्थान असते. तिथे कोणतीही ज्वलनशील वस्तू ठेवू नये. आपल्याकडून जाणूनबुजून किंवा नकळत तसे होत असल्यास त्याचे नुकसान सहन करावे लागते.
षट्तिला एकादशीला या मंत्रांचा जप शुभ फळदायी! लक्ष्मी-नारायणाचा आशीर्वाद
advertisement
नकारात्मक शक्ती आकर्षित होऊ लागतात - ज्योतिषांच्या मते पूजाघरात माचिस ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते. या अशुभ शक्ती आपल्या सर्व चालू कार्यात अडथळा आणून शुभ कार्यात विलंब लावतात. या नकारात्मक शक्तींमुळे घरात पैशांची कमतरता भासते आणि डोक्यावर कर्जाचे ओझेही वाढते. असे केल्याने केलेल्या उपासनेचे योग्य फळ मिळत नाही.
घरामध्ये या ठिकाणी आगपेटी ठेवावी - वास्तुशास्त्रींच्या मते, घरात माचिस ठेवण्यासाठी बंद जागा किंवा बंद कपाटाचा वापर करावा. असे केल्याने नकारात्मक शक्ती घरापासून दूर राहतात आणि कुटुंबाची प्रगती होते. यामुळे कुटुंबात संपत्तीचा प्रवाह वाढतो आणि मुलांकडून शुभवार्ता प्राप्त होतात.
अनंत अडचणींचा आल्या! आता या राशींचे मंगळ उजळणार भाग्य; सगळीकडून लाभाचे योग
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)