Shattila Ekadashi Puja Mantra: षट्तिला एकादशीला या मंत्रांचा जप शुभ फळदायी! लक्ष्मी-नारायणाचा आशीर्वाद
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Ekadashi Puja Mantra: भक्तिभावानं षट्तिला एकादशीचे व्रत केले तर त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात, सुख आणि सौभाग्य मिळते. याशिवाय या दिवशी देवी लक्ष्मीचे मंत्र जप करणे खूप चांगले मानले जाते.
मुंबई : दर महिन्याच्या कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथीला एकादशी व्रत केले जाते. या दिवशी पांडुरंग म्हणजेच भगवान विष्णूसाठी उपवास केला जातो आणि विधीनुसार पूजा केली जाते. पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला षट्तिला एकादशीचे व्रत असे म्हणतात.
धार्मिक मान्यतेनुसार, एखाद्या व्यक्तीने खऱ्या भक्तिभावानं षट्तिला एकादशीचे व्रत केले तर त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात, सुख आणि सौभाग्य मिळते. याशिवाय या दिवशी देवी लक्ष्मीचे मंत्र जप करणे खूप चांगले मानले जाते. पंडित रमाकांत मिश्रा यांच्या मते, षट्तिला एकादशीच्या दिवशी देवी लक्ष्मीच्या मंत्रांचा जप करणे खूप शुभ मानले जाते. जाणून घेऊया या दिवशी कोणते मंत्र जपावेत.
advertisement
षट्तिला एकादशी कधी आहे?
हिंदू वैदिक कॅलेंडरनुसार, यावेळी पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथी 24 जानेवारी रोजी संध्याकाळी 07:25 वाजता सुरू होईल आणि 25 जानेवारी रोजी रात्री 08:31 वाजता संपेल. उदयतिथी आधारे षट्तिला एकादशीचे व्रत 25 जानेवारी रोजी पाळले जाईल.
देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या मंत्रांचा करा जप -
ॐ श्रीं ह्रीं क्लीं श्री सिद्ध लक्ष्म्यै नम:
advertisement
ॐ धनाय नम:
ॐ ह्रीं श्री क्रीं क्लीं श्री लक्ष्मी मम गृहे धन पूरये, धन पूरये, चिंताएं दूरये-दूरये स्वाहा:
ऊं ह्रीं त्रिं हुं फट
ॐ लक्ष्मी नम:
ॐ श्रीं ह्रीं क्लीं श्री सिद्ध लक्ष्म्यै नम:
धनाय नमो नम:
ॐ ह्रीं ह्रीं श्री लक्ष्मी वासुदेवाय नम:
लक्ष्मी नारायण नम:
पद्मानने पद्म पद्माक्ष्मी पद्म संभवे तन्मे भजसि पद्माक्षि येन सौख्यं लभाम्यहम्
advertisement
षट्तिला एकादशी पूजा -
षट्तिला एकादशीच्या दिवशी प्रात:विधी आटोपून स्नान करावे, त्यानंतर योग्य पद्धतीने तुळशीची पूजा करा आणि शृंगाराच्या वस्तू तिला अर्पण करा. तुळशीला हळद आणि चंदन लावा, तुळशीच्या झाडाजवळ तुपाचा दिवा लावा आणि नंतर तुळशीला लाल चुनरी, बांगड्या, सिंदूर आणि इतर साहित्य अर्पण करावे.
advertisement
षट्तिला एकादशीला तिळाचे महत्त्व -
पद्मपुराणानुसार, षट्तिला एकादशीच्या दिवशी जर उपवास करणाऱ्या व्यक्तीने भगवान विष्णूच्या पूजेमध्ये तीळ किंवा तिळाचे इतर पदार्थ अर्पण केले तर त्याला भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळतो. असे मानले जाते की, या दिवशी तीळ दान केले तर व्यक्तीला पापांपासून मुक्ती मिळते. षट्तिला एकादशीचे व्रत करून, तिळाचे तेल लावून स्नान, दान, जल अर्पण आणि पूजा केली जाते. या दिवशी प्रामुख्याने तीळ वापरणे शुभ मानले जाते.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 22, 2025 1:34 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Shattila Ekadashi Puja Mantra: षट्तिला एकादशीला या मंत्रांचा जप शुभ फळदायी! लक्ष्मी-नारायणाचा आशीर्वाद