वास्तुशास्त्रानुसार, घरात दिवा लावणं अत्यंत शुभ आणि सकारात्मक मानलं जाते. दिवा लावल्यानं वातावरणात सकारात्मक ऊर्जा येते आणि घरात आनंद आणि समृद्धी येते. तथापि, वास्तुशास्त्र असंही सांगतं की दिवा लावताना दिशेच्या बाबतीत विशेष लक्ष दिले पाहिजे, कारण त्याचे प्रतिकूल परिणाम होऊ शकतात. जळता दिवा कोणत्या दिशेला लावू नये याबाबत आज जाणून घेऊया.
advertisement
दक्षिण दिशेला दिवा लावू नये - वास्तुशास्त्रानुसार, घराच्या दक्षिण दिशेला कधीही जळता दिवा लावू नये. धार्मिक श्रद्धेनुसार दक्षिण दिशा ही यमराजाची दिशा मानली जाते. या दिशेला दिवा लावल्यानं घरात नकारात्मकता वाढू शकते, ज्यामुळे कुटुंबातील लोकांना मानसिक ताण आणि चिंता जाणवू शकते. असंही मानलं जातं की, या दिशेला दिवा लावल्यानं आर्थिक नुकसान होऊ शकतं, घरातील शांती आणि आनंद नाहीसा होऊ शकतो.
धार्मिक मान्यतेनुसार, कोणतेही शुभ कार्य किंवा या दिशेला दिवा लावल्यानं अशुभ परिणाम मिळू शकतात. म्हणूनच वास्तुशास्त्र दक्षिण दिशेला दिवा न लावण्याचा सल्ला दिला जातो.
देवी दुर्गेची 9 रुपं आणि नऊ रंग..! नवरात्रीत कोणत्या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे
मग कोणत्या दिशेला दिवा लावावा?
तुम्हाला तुमचे घर नेहमी धन, समृद्धी आणि आनंदानं भरलेले हवं असेल तर दिवा लावण्यासाठी उत्तर दिशेची निवड करणे ही सर्वोत्तम दिशा मानली जाते. उत्तर दिशा ही संपत्तीची देवता कुबेराची दिशा मानली जाते. या दिशेला दिवा लावल्यानं घरात कधीही संपत्ती आणि समृद्धीची कमतरता भासत नाही आणि कुटुंब कुबेराचे आशीर्वादित राहते.
घरात दिवा लावण्याचे वास्तु नियम - दिवा लावताना नेहमी शुद्ध तूप किंवा तिळाचे तेल वापरा. घरात, मंदिरात किंवा पूजास्थळी दिवा लावल्यानं शुभ परिणाम मिळतात. जळणारा दिवा घराच समृद्धी आणि प्रेरणा आणतो.
घटस्थापनेपासून सुरू होणारा आठवडा कोणासाठी लकी? सर्व 12 राशींचे साप्ताहिक राशीफळ
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)