Citroen C3 मध्ये एंट्री-लेव्हल लाइव्ह व्हेरिएंट हे आधीच्या मॉडेलपेक्षा 98,000 रुपयांनी स्वस्त आहे. तर फील व्हेरिएंटची किंमत 1.29 लाख रुपयांची कपात केली आहे. नवीन Citroen C3 मध्ये नवीन फील (O) ट्रिम चा समावेश केला आहे. या मॉडेलची किंमत 7.27 लाख रुपये आहे. सगळ्या पेट्रोल व्हेरिएंट्सवर अतिरिक्त 93,000 रुपयांचा रेट्रोफिट CNG किट उपलब्ध आहे. X शाइन टर्बो-पेट्रोल व्हेरिएंट्समध्ये ड्यूल-टोन कलर ऑप्शन्स स्टँडर्ड आहे. तर X शाइन नॅचुरल एस्पिरेटेड व्हेरिएंटमध्ये ड्युल-टोन शेड अतिरिक्त 15,000 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
advertisement
रंगाचा पर्याय
2025 Citroen C3 मध्ये नवीन गार्नेड रेड रंगाचा समावेश केला आहे. जो सिंगल-टोन आणि ड्यूल-टोन (ब्लॅक रूफसह) दोन्ही पर्यायामध्ये उपलब्ध आहे. बाकी इतर कलर प्रकारामध्ये पोलर व्हाइट, प्लेटिनम ग्रे, कॉस्मो ब्लू, पेरला नेरा ब्लॅक आणि पोलर व्हाइट रूफसह कॉस्मो ब्लू रंगाचा समावेश केला आहे.
फिचर्स
नवीन 2025 Citroen C3 हॅचबॅकमध्ये कोणतेही मोठे बदल केलेले नाही. पण, नवीन X शाइन ट्रिम प्रकारामध्ये टेलगेट वर ‘X’ बॅज दिला आहे. नवीन टॉप-अँड व्हेरिएंट ऑटो डिमिंग IRVM, पुश बटन स्टार्ट, कीलेस एंट्री आणि क्रूज़ कंट्रोलसह येतेय.सोबतच 360-डिग्री कॅमेराचा पर्याय दिला आहे. पण यासाठी तुम्हाला 25,000 रुपये मोजावे लागतील. टॉप ट्रिम्स मॉडेलमध्ये लेदरट डॅशबोर्ड फिनिश आहे. तर लाइव्ह आणि फिल व्हेरिएंट्समध्ये क्रमशः ‘इंजेक्टेड ग्रे’ आणि ‘एनोडाइज्ड ग्रे’ प्लास्टिक फिनिश दिलं आहे. या प्रकारामध्ये आवश्यक ते बदल करून ग्राहक किंमत कमी जास्त करू शकतात.