TRENDING:

Scooter: घरात सगळेच वापरू शकता, भारतातील बेस्ट असे 5 Scooter, किंमतही बजेटमध्ये

Last Updated:

मार्केटमधून सामान आणायचं असेल, मुलांना शाळेतून घरी आणायचं असेल तर स्कुटरही सगळ्यात बेस्ट असा पर्याय आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
भारतात सध्या ऑटो इंडस्टीमध्ये किंमतीत कपात झाल्यामुळे बरेच चांगले पर्याय उपलब्ध आहे. कार असेल किंवा बाईक घ्यायची असेल तर किंमती आता बजेटमध्ये आहे. त्यातच मध्यमवर्गीय कुटुंबीयांसाठी स्कुटरही बेस्ट ऑप्शन आहे. मार्केटमधून सामान आणायचं असेल, मुलांना शाळेतून घरी आणायचं असेल तर स्कुटरही सगळ्यात बेस्ट असा पर्याय आहे. भारतात सध्या ५ अशा स्कुटर आहे, ज्यांची विक्री आणि पसंती चांगली आहे.
News18
News18
advertisement

यामध्ये पहिल्या क्रमांकावर येते.  TVS Jupiter. TVS मोटर्सची TVS Jupiter ही एक बेस्ट सेलिंग  होणाऱ्या स्कुटरपैकी एक आहे. उत्तम मायलेज आणि दमदार फिचर्समुळे TVS Jupiter सगळ्यांची फेव्हरेट आहे.  ज्युपिटर १२५ मध्ये पूर्णपणे १२-इंच अलॉय व्हील्स, टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स, फ्रंट डिस्क ब्रेक आणि रिअर ड्रम ब्रेक दिले आहे. TVS Jupiter मध्ये यूएसबी चार्जिंग पोर्ट आहे.  TVS ज्युपिटर १२५ मध्ये  १२५ सीसी सिंगल-सिलेंडर इंजिन आहे जे ८ बीएचपी आणि १०.५ एनएम पीक टॉर्क निर्माण करते. अलिकडेच जोडलेल्या आयगो असिस्टमुळे हे आउटपुट ८.४४ बीएचपी आणि ११.१ एनएम पर्यंत वाढते. हे इंजिन CVT ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेला आहे.

advertisement

Honda Activa 6G - होंडा मोटर्सची   Honda Activa 6G ही एक लोकप्रिय स्कुटर आहे. या स्कुटरमध्ये  विश्वासार्ह इंजिन, i3S तंत्रज्ञान दिलं आहे.  honda activa 6G ही एक्टिवा सीरिजमध्ये सगळ्यात बेस्ट अशी मानली जाते. या स्कुटरमध्ये 109.51 सीसी 4-स्ट्रोक इंजिन आहे. SI इंजिन (BS6 2.0 कंप्लायंट)सह असून 8000 rpm वर 7.99 PS ची पॉवर जनरेट करते. 5500 rpm वर 9.05 Nm इतका टॉर्क जनरेट करते. या स्कुटरचं मायलेज जवळपास 59.5 kmpl आहे. honda activa 6G या स्कुटरमध्ये  5.3 लिटर इतका फ्युल टँक, टेलीस्कोपिक फ्रंट सस्पेंशन आणि 3-स्टेप एडजस्टेबल रिअर सस्पेंशन, कम्बाइंड ब्रेकिंग सिस्टम (CBS) सह ड्रम ब्रेक, ट्यूबलेस टायर दिले आहे.

advertisement

Honda Dio - होंडाची आणखी एक स्कुटर स्वस्त आणि मस्त आहे.  Honda Dio ही नव्याने लाँच केली आहे. या स्कुटरची किंमत ६८,८४६ हजारांपासून सुरू होते.   Dio चं हे अपडेटेड व्हर्जन आहे. Honda Dio चे २ व्हेरिएंट DLX आणि H-Smart विक्रीसाठी उपलब्ध आहे. 2025 होंडा डियो आता नवी 4.2-इंच TFT इंस्ट्रूमेंट क्लस्टरसह आहे. यात मायलेज इंडिकेटर, ट्रिप मीटर, इको इंडिकेटर आणि रेंज पाहता येईल. या स्कुटरमध्ये आइडलिंग स्टार्ट/स्टॉप सिस्टम सुद्धा दिली आहे.

advertisement

Suzuki Access 125 - सुझुकी मोटर्सची Suzuki Access 125 ही एक लोकप्रिय स्कुटर होते. या स्कुटरमध्ये १२५ सीसी सिंगल-सिलेंडर इंजिनसाठी बेस्ट आहे. हे इंजिन ६,५०० आरपीएम वर ८.३ बीएचपी पॉवर आणि ५,००० आरपीएम वर १०.२ एनएम पीक टॉर्क निर्माण करतं. पर्ल मॅट अ‍ॅक्वा सिल्व्हर रंगाच्या समावेशामुळे स्कूटरचे रंग पर्याय पाच पर्यंत वाढला आहे. ज्यामध्ये मेटॅलिक मॅट ब्लॅक नंबर २, मेटॅलिक मॅट स्टेलर ब्लू, पर्ल ग्रेस व्हाइट आणि सॉलिड आइस ग्रीन यांचा समावेश आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
स्वप्नांचा झाला 'लाल चिखल', टोमॅटोला भाव नसल्यामुळे 2.50 लाखांचं नुकसान, Video
सर्व पहा

TVS Ntorq 125: TVS मोटर्सची Ntorq 125 ही एक स्पोर्टी लूक आणि दमदार परफॉर्मन्स देणारी स्कुटर आहे. त्यामुळे तरुणांमध्ये फेमस आहे.  या स्कुटरची किंमतही   80,900 (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. Ntorq 125 मध्ये 124.8cc इंजिन आहे. या स्कूटरमध्ये फ्रंट डिस्क ब्रेक, दणकट फ्रेम आणि रोजच्या वापरासाठी पुरेशी मोठी स्टोरेज स्पेस आहे. ज्यांना वेगवान आणि स्पोर्टी राइडचा अनुभव घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी टीव्हीएस Ntorq 125 हा एक बेस्ट ऑप्शन आहे.

मराठी बातम्या/ऑटो/
Scooter: घरात सगळेच वापरू शकता, भारतातील बेस्ट असे 5 Scooter, किंमतही बजेटमध्ये
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल