Tomato Price : शेतकऱ्याचा स्वप्नांचा झाला 'लाल चिखल', टोमॅटोला भाव नसल्यामुळे 2.50 लाखांचं नुकसान, Video
- Reported by:Patel Irfan Hassan
- Published by:Mohan Najan
Last Updated:
काळया मातीत घाम गाळून, कर्ज काढून, पोटच्या लेकराप्रमाणे जपलेल्या टोमॅटोला बाजारात योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
सोलापूर - काळया मातीत घाम गाळून, कर्ज काढून, पोटच्या लेकराप्रमाणे जपलेल्या टोमॅटोला बाजारात योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात राहणाऱ्या अश्विनी आटगळे यांनी दीड एकरात टोमॅटोची लागवड केली होती. टोमॅटो लागवडीला 1 लाख रुपयांपर्यंत खर्च आला होता. पण बाजारात टोमॅटोला दर मिळत नसल्याने शेतामध्येच टोमॅटो खराब होत चालला असून जवळपास दोन ते अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
पंढरपूर तालुक्यात राहणाऱ्या अश्विनी आटगळे यांनी टोमॅटो लागवड करण्याआधी द्राक्षाची लागवड केली होती. परंतु द्राक्ष बागेत अधिक नफा न मिळाल्याने अश्विनी यांनी टोमॅटोची लागवड करण्याचा निर्णय घेतला आणि दीड एकरमध्ये असलेली द्राक्ष बाग तोडून त्यामध्ये टोमॅटोची लागवड केली. टोमॅटोला अश्विनी यांनी पोटच्या मुलाप्रमाणे जपले. रोग पडू नये यासाठी वेळोवेळी फवारणी केली आणि उत्तम पद्धतीने टोमॅटोची लागवड केली. पण सध्या टोमॅटोला बाजारात योग्य भाव मिळत नसल्याने शेतामध्ये टोमॅटो खराब होत आहे.
advertisement
टोमॅटोला तीन ते चार रुपये किलो दर मिळत असल्याने लागवडीचा खर्च निघणार नाही आणि मजुरी, वाहतूक यांचा देखील खर्च निघत नसल्याने शेतामध्ये टोमॅटो खराब होत आहे. दीड एकरात टोमॅटो लागवडीसाठी अश्विनी यांना जवळपास एक लाख रुपयांपर्यंत खर्च आला आहे. तर कवडीमोल दर मिळत असल्याने दोन ते अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
advertisement
सोलापुरात झालेल्या पावसामुळे अनेक भागात टोमॅटोचे पीक अंशतः नाश पावले आहे आणि जे पीक वाचले आहे त्या पिकांना बाजारात भाव न मिळत असल्याने बळीराजा दुहेरी संकटात सापडल्याचे दिसत आहे. एकीकडे बियाणे, औषधे, खत, मजुरी यांचा खर्च वाढत असताना उत्पादनाला कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी पाहिलेल्या स्वप्नांचा लाल चिखल होत आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
Dec 10, 2025 9:44 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
Tomato Price : शेतकऱ्याचा स्वप्नांचा झाला 'लाल चिखल', टोमॅटोला भाव नसल्यामुळे 2.50 लाखांचं नुकसान, Video








