advertisement

Fact Check: गुरुवारी मुंबईत शाळा बंद राहणार का? प्रशासनाचं स्पष्टीकरण आलं समोर

Last Updated:

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शासकीय सुटी जाहीर केली असून पुढचे तीन दिवस दुखवटा जाहीर केला आहे.

School Closed: मुंबईतल्या शाळांना उद्या सुट्टी, किती दिवस राहणार शाळा बंद?
School Closed: मुंबईतल्या शाळांना उद्या सुट्टी, किती दिवस राहणार शाळा बंद?
राज्यामध्ये उद्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज बारामती इथं विमान अपघातात अपघाती निधन झालं आहे. या दुर्देवी घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शासकीय सुटी जाहीर केली असून पुढचे तीन दिवस दुखवटा जाहीर केला आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून अधिकृत माहिती मिळाली असून त्यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर ही महत्त्वाची बातमी शेअर केलेली आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभरात तीन दिवसीय दुखवटा जाहीर केला आहे. तर, शाळांना फक्त एकच दिवस म्हणजेच (28 जानेवारी- बुधवार) सुट्टी जाहीर झालेली आहे. तीन दिवस म्हणजेच, 28 जानेवारी ते 30 जानेवारी असा तीन दिवस राज्यभरात दुखवटा जाहीर केला आहे.. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण राज्यामध्ये तीन दिवसांचा राज्य दुखवटा जाहीर करताच महाराष्ट्रातील सर्व शासकीय इमारतींवरील, मंत्रालयावरील, प्रशासकीय कार्यालयांसह इत्यादी ठिकाणवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर आणला गेला. या काळामध्ये सर्व सरकारी कार्यालये आणि शैक्षणिक संस्था बंद राहतील.
advertisement
advertisement
अजित पवार यांच्या अकाली एक्झिटने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. खरंतर, आजचा दिवस फक्त बारामतीकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठीच अत्यंत शोकजनक ठरला आहे. अवघ्या काही दिवसांवरच जिल्हापरिषद निवडणूका येऊन ठेपल्या आहेत आणि यामध्येच अचानक अजित पवार यांचं अचानक जाणं सर्वांच्याच मनाला चटका लावून जाणारं आहे. जिल्हा परिषद निवडणूकांच्या प्रचार सभांच्या निमित्ताने मुंबईवरून बारामतीकडे जाण्यासाठी अजित पवार निघाले होते. बारामती दौऱ्यादरम्यान बारामतीत अजितदादांचं विमान लँडिंग करत असताना विमान कोसळून आग भडकली.
advertisement
या विमान अपघातात अजित पवारांसह सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, सुरक्षारक्षक विदीप जाधव, विमान परिचर पिंकी माळी, पायलट कॅप्टन सुमित कपूर आणि सहवैमानिक शांभवी पाठक यांचा समावेश आहे. अजित पवार यांच्या निधनाने पवार कुटुंबासह राष्ट्रवादीचे समर्थकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.. दरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्रातूनच नाही तर अगदी दिल्लीतल्या नेत्यांनी आणि मराठी सेलिब्रिटींनी देखील हळहळ व्यक्त केली आहे. तसेच अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी देखील टाहो फोडला आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Fact Check: गुरुवारी मुंबईत शाळा बंद राहणार का? प्रशासनाचं स्पष्टीकरण आलं समोर
Next Article
advertisement
दुबईतून Gold खरेदीचे स्वप्न आता विसरा, एका घटनेमुळे पायाखालची जमीन सरकली; सोने आणणाऱ्यांना बसला मोठा झटका
दुबईतून Gold खरेदीचे स्वप्न आता विसरा, एका घटनेमुळे पायाखालची जमीन सरकली
  • दुबईत सोनं खरेदी करणं आता अशक्य

  • सामान्यांना मोठा झटका

  • सर्व गणितं कोलमडली

View All
advertisement