advertisement

'क्रांतिज्योती विद्यालय'चा धुरळा कायम! बॉक्स ऑफिसवर गाजवला चौथा वीकेंड; Border 2 देतोय तगडी टक्कर, कमाई किती?

Last Updated:

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Movie: सनी देओलच्या 'बॉर्डर २' ने सध्या बॉक्स ऑफिसवर त्सुनामी आणली असली, तरी हेमंत ढोमेच्या या 'मराठी शाळे'ने आपला गड भक्कम राखला आहे.

News18
News18
मुंबई : बॉलीवूडचे मोठे सिनेमे आले की प्रादेशिक चित्रपटांना फटका बसतो, असा एक समज आहे. पण या समजाला 'क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम' (KJVMM) या सिनेमाने अक्षरशः धुऊन काढले आहे. सनी देओलच्या 'बॉर्डर २' ने सध्या बॉक्स ऑफिसवर त्सुनामी आणली असली, तरी हेमंत ढोमेच्या या 'मराठी शाळे'ने आपला गड भक्कम राखला आहे. प्रदर्शनाच्या चौथ्या आठवड्यातही या चित्रपटाने दिमाखात एंट्री करत प्रेक्षकांना सिनेमागृहाकडे खेचून आणले आहे.

चौथ्या वीकेंडलाही कमाईचा धडाका

१ जानेवारी २०२६ ला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने यशाची नवनवीन शिखरे पार केली आहेत. ताज्या आकडेवारीनुसार, चौथ्या वीकेंडला (२४ आणि २५ जानेवारी) या चित्रपटाने २.७७ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. यासह चित्रपटाची आतापर्यंतची एकूण नेट कमाई २३.२६ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. ४ ते ६ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमाने तब्बल ४०० टक्क्यांहून अधिक नफा मिळवत २०२६ चा पहिला सुपरहिट मराठी सिनेमा होण्याचा मान मिळवला आहे.
advertisement
'चलचित्र मंडळी'च्या अधिकृत सोशल मीडियावरुन याविषयी पोस्ट शेअर करण्यात आली. पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'सर्व स्पर्धा जिंकत आपली मराठी शाळा बोर्डात पहिली! अजून बराच प्रवास बाकी आहे… महाराष्ट्राचा महासिनेमा आता ऐतिहासिक वळणावर! ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात उदंड प्रतिसादात सुरू!'
advertisement
advertisement

का चालतोय हा सिनेमा?

'क्रांतिज्योती विद्यालय...' हा केवळ सिनेमा नाही, तर ती प्रत्येक मराठी माणसाच्या काळजात घर केलेल्या 'मराठी शाळे'ची गोष्ट आहे. हेमंत ढोमेचे दिग्दर्शन आणि सचिन खेडेकर, क्षिती जोग, प्राजक्ता कोळी यांसारख्या कलाकारांच्या अभिनयाने प्रेक्षकांना भावुक केले आहे. "स्पर्धा कितीही मोठी असली, तरी आपली मराठी शाळा बोर्डात पहिलीच येणार," अशा भावना निर्मात्यांनी सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
'क्रांतिज्योती विद्यालय'चा धुरळा कायम! बॉक्स ऑफिसवर गाजवला चौथा वीकेंड; Border 2 देतोय तगडी टक्कर, कमाई किती?
Next Article
advertisement
दुबईतून Gold खरेदीचे स्वप्न आता विसरा, एका घटनेमुळे पायाखालची जमीन सरकली; सोने आणणाऱ्यांना बसला मोठा झटका
दुबईतून Gold खरेदीचे स्वप्न आता विसरा, एका घटनेमुळे पायाखालची जमीन सरकली
  • दुबईत सोनं खरेदी करणं आता अशक्य

  • सामान्यांना मोठा झटका

  • सर्व गणितं कोलमडली

View All
advertisement