वाढत्या तापमानाचा सर्वात मोठा फटका वाहनाच्या रेंज आणि कार्यक्षमतेवर बसतो. उन्हाळ्यात गाडी थंड ठेवण्यासाठी कूलिंग सिस्टमला जास्त ऊर्जा खर्च करावी लागते, तसेच एसीचा वापरही वाढतो. यामुळे बॅटरीची चार्जिंग क्षमता 10 ते 15 टक्क्यांनी कमी होऊ शकते. सततच्या अतितापमानामुळे आणि चुकीच्या पद्धतीने चार्जिंग केल्यास (ओव्हरचार्जिंगमुळे) बॅटरीच्या सेल्सचे कायमस्वरूपी नुकसान होते, ज्यामुळे बॅटरीचे एकूण आयुष्य हळूहळू घटत जाते.
advertisement
Tata Punch EV: टाटाचा मोठा धमाका, आणली दणकट SUV, 468 किमी बिनधास्त फिरा!
उन्हाळ्यात वाहनधारकांनी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?
वाहन नेहमी सावलीत किंवा कव्हरखाली पार्क करावे, जेणेकरून थेट सूर्यप्रकाश बॅटरीवर पडणार नाही. गाडी चालवून आल्यावर ती लगेच चार्जिंगला लावू नका; बॅटरीचे तापमान सामान्य होण्यासाठी थोडा वेळ द्या. शक्यतो रात्रीच्या वेळी किंवा थंड वातावरणात चार्जिंग करणे हिताचे ठरते. तसेच, उन्हाळ्यात बॅटरी 100% फुल चार्ज करण्याऐवजी ती 80 ते 90 टक्क्यांपर्यंतच चार्ज करणे अधिक सुरक्षित मानले जाते.
गाडी चालवताना काही धोक्याच्या सूचनांकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. जर गाडीतून प्लास्टिक जळल्यासारखा वास येत असेल, डॅशबोर्डवर बॅटरी टेम्परेचरची लाल वॉर्निंग लाईट लागली असेल किंवा बॅटरीची टक्केवारी अचानक वेगाने कमी होत असेल, तर त्वरित गाडी थांबवा. अशा वेळी गाडी सावलीत उभी करून तज्ज्ञ मेकॅनिक किंवा सर्विस सेंटरशी संपर्क साधावा. उन्हाळ्यात वाहनाच्या टायरमधील हवेचे प्रमाणही योग्य ठेवावे, जेणेकरून मोटरवर अतिरिक्त ताण पडणार नाही.





