इंजिन ऑइल किती वेळा बदलावे
इंजिन ऑइल बदलण्याचा निर्णय प्रामुख्याने तेलाच्या प्रकारावर आणि तुमच्या ड्रायव्हिंग पॅटर्नवर अवलंबून असतो. सामान्य परिस्थितीत, बहुतेक कार उत्पादक दर 5,000 ते 10,000 किलोमीटर किंवा 6 महिन्यांपासून 1 वर्षांनी ऑइल बदलण्याची शिफारस करतात. तसंच, हिवाळ्यात हा नियम थोडासा बदलतो. तुम्ही खूप कमी वेळ गाडी चालवत असाल, तर शिफारस केलेल्या मायलेजपेक्षा लवकर इंजिन ऑइल बदलणे चांगले. तज्ञांचा असा सल्ला आहे की, तुम्ही थंड प्रदेशात राहत असाल आणि तुमचे ड्रायव्हिंग बहुतेक थंड असेल, तर 6 महिन्यांच्या अंतरापूर्वी ऑइलची क्वालिटी तपासा. तुमच्या कारमध्ये सिंथेटिक तेल वापरणे हा एक चांगला नियम आहे, कारण ते थंड तापमानातही चांगले कम्बाशचन राखते.
advertisement
CNG Car Blast: तुमची सेकंड हँड CNG कार बनू शकते 'टाइम बॉम्ब', खरेदीपूर्वी असं करा चेक
इंजिन खराब करू शकणारी चूक
इंजिन ऑइल बदलताना सर्वात सामान्य चूक म्हणजे चुकीचा व्हिस्कोसिटी ग्रेड वापरणे. प्रत्येक कारच्या मालकाच्या मॅन्युअलमध्ये इंजिनसाठी योग्य ऑइल ग्रेड (जसे की 5W-30 किंवा 0W-20) सूचीबद्ध केला आहे. हिवाळ्यात, 'W' च्या आधीची संख्या जितकी कमी असेल (जसे की 0W किंवा 5W), थंड असताना ते पातळ होईल आणि ते इंजिनला जितके जलद लुब्रिकेट करु शकेल. कमी व्हिस्कोसिटी तेल न वापरणे किंवा स्वस्त/नकली तेल न वापरणे यामुळे इंजिन सुरू होण्याचा वेळ जास्त होऊ शकतो आणि घटकांवर झीज वाढू शकते. म्हणून, हिवाळा सुरू होण्यापूर्वी, तुमच्या इंजिनचे संरक्षण करण्यासाठी आणि त्याचे आयुष्य वाढवण्यासाठी, तुमच्या कारसाठी नेहमीच रिकमेंडेड आणि हाय क्वालिटी इंजिन ऑइल वापरा, विशेषतः जर ते कृत्रिम असेल तर.
