स्वस्त विमा किंवा इन्शुरन्स घेतल्यावर कार अपघातानंतर जेव्हा तुम्ही कारचा विमा काढण्यासाठी जाता तेव्हा तुम्हाला मोठा धक्का बसण्याची शक्यता असते. तिथे गेल्यावर तुमच्या गाडीचा विमा खोटा असल्याचे कळते. अशा परिस्थितीत विमा उपलब्ध होणार नाही शिवाय तो नसल्यामुळे कायदेशीर कारवाई केली जाईल ते वेगळंच.
कार विमा संपण्याच्या फक्त 10 दिवस आधी, ग्राहकाला वेगवेगळ्या कंपन्यांचे फोन कॉल्स येतात. ज्यामध्ये ग्राहकांना वेगवेगळ्या ऑफर्स दिल्या जातात. काही स्वस्त विमा देखील देतात, काही स्वस्त विम्यासह व्हाउचर देखील देतात. लोक याच गोष्टींच्या मोहात अडकतात आणि आपल्या पायावर कुऱ्हाड मारुन घेतात.
advertisement
पण आजकाल लोक स्वस्तात विमा मिळविण्यासाठी घोटाळेबाजांच्या जाळ्यात पडत आहेत. सर्व प्रथम, आम्ही तुम्हाला सांगू की ही कार विम्याची फसवणूक कशी होते?
- कार विमा घोटाळा...खोट्या विमा कंपन्या, फसवे एजंट किंवा मध्यस्थ यांच्या द्वारे केले जाते.
-स्कॅमर ग्राहकांना बाजार दरापेक्षा कमी दराने कार विमा देतात.
- स्कॅमरकडे ग्राहकाच्या कारचा संपूर्ण डेटा असतो जेणेकरून ग्राहकांचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास असेल.
- त्यानंतर स्कॅमर कार मालकाकडून ऑनलाइन पेमेंट घेतात आणि त्या बदल्यात बनावट कार विमा देतात.
कंपनीचा बनावट लोगो लावून विमा देतात
घोटाळेबाजांनी पाठवलेल्या बनावट विम्यावर एका सुप्रसिद्ध कंपनीचा लोगो छापलेला असतो आणि अस्सल कंपनीने पाठवलेल्या कोटेशनमध्ये सर्वकाही अगदी तंतोतंत लिहिलेलं असतं. पण इथूनच या फसवणुकीला सुरुवात होते.
बनावट कार विमा टाळण्यासाठी टिप
आता आम्ही तुम्हाला काही महत्त्वाच्या टिप्स देत आहोत. जेणे करून तुम्ही या प्रकारची फसवणूक टाळू शकता.
- नेहमी अधिकृत कंपनीकडूनच कार विमा घ्या.
- कार विमा पॉलिसीची खात्री करून घ्या.
- कोणत्याही एजंटकडून कारचा विमा घेऊ नका.
- तुम्ही ज्या एजन्सीकडून कार खरेदी केली आहे त्याच एजन्सीकडून कारचा विमा घ्या.