Tata Punch - सगळ्या पहिली येते ती टाटा मोटर्सची लोखंडासाठी मजबूत आणि दमदार अशी टाटा पंच. टाटा पंचही सर्वाधिक विक्री होणारी मिड साईज एसयूव्ही आहे. या एसयूव्हीची किंमत 5.50 लाखांपासून सुरू होते. Global NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. भारतातील सर्वात सुरक्षित एसयूव्ही म्हणून टाटा पंचला मान मिळाला आहे. टाटा पंचचं इंजिन 1.2L पेट्रोल आहे. यामध्ये CNG पर्याय सुद्धा उपलब्ध आहे. टाटा पंचच्या मायलेजबद्दल बोलायचं झालं तर पेट्रोल व्हेरिएंटमध्ये २०.८ किमी प्रति लिटर आणि सीएनजीमध्ये २६.९९ किमी मायलेज देते.
advertisement
Nissan Magnite - निसान मोटर्सने भारतीय मार्केटमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून स्वस्तात मस्त अशी SUV मध्यवर्गीयांना डोळ्यासमोर ठेवून लाँच केली आहे. निसानची Magnite ही भारतात सगळ्यात स्वस्त एसयूव्ही आहे. या Magnite वर सध्या दिवाळीच्या काळात 89,000 रुपयांची सूट दिली आहे. Magnite किंमत 5.62 लाख (एक्स-शोरूम) आहे. कंपनी यावर 89,000 रुपयांपर्यंत सूट दिली आहे. एवढंच नाहीतर कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बोनस आणि 1 ग्रॅम गोल्ड कॉईन ऑफरचा दिली आहे. Magnite मध्ये 72hp पेट्रोल आणि 100hp टर्बो-पेट्रोल इंजिनचे पर्याय दिला आहे.
Renault Triber - जर तुम्हाला एसयूव्हीच्या किंमतीत ७ सीटर गाडी खरेदीसाठी उपलब्ध असेल तर? होय, मग यासाठी Renault Triber हा बेस्ट पर्याय आहे. जगातली ही सगळ्यात स्वस्त अशी ७ सीटर एमपीव्ही आहे. कंपनीने अलीकडे Renault Triber चं नवीन फेसलिफ्ट मॉडेल लाँच केलं आहे. Renault Triber वर सध्या दिवाळीत 75,000 पर्यंत सूट दिली आहे. Renault Triber ची किंमत ही 5.76 लाख (एक्स-शोरूम) आहे आणि कंपनी यावर 75,000 पर्यंतची ऑफर दिली आहे. यात कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट ऑफर्सचा समावेश आहे. Triber मध्ये 72hp चे पेट्रोल इंजिन दिलं आहे.
Renault Kiger - रेनॉल्ट मोटर्सची आणखी एक स्वस्त आणि मस्त कार म्हणजे Renault Kiger आहे. ही छोटीशी कार सिंगल फॅमिलीसाठी बेस्ट आहे. Renault Kiger वर 70,000 पर्यंतची ऑफर दिली आहे. Kiger ची किंमत 5.76 लाख ते 10.34 लाख (एक्स-शोरूम) च्या दरम्यान आहे. यात 72hp नॅचरली एस्पिरेटेड आणि 100hp टर्बो-पेट्रोल इंजिनचा पर्याय आहे.
Hyundai Exter -दक्षिण कोरियन कंपनी Hyundai ची Exter ही एक फॅमिली एसयूव्ही आहे. विशेष म्हणजे, Hyundai Exter मायलेजच्या बाबतीत मारुती सुझुकीला टक्कर देते. Hyundai Exter मध्ये व्हॉइस इनेबल्ड इलेक्ट्रिक सनरूफ आहे. कारमध्ये ड्युएल डॅशकॅम, सहा एअरबॅग्ज, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, वायरलेस चार्जर, टीपीएमएस, थ्री पॉइंट सीटबेल्ट यांसारखी फीचर्स आहे. बेस व्हॅरिएंटमध्ये देखील देण्यात येतात. Hyundai Exter मध्ये 1.2 लिटरचं नॅचरली अॅस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहे.पेट्रोल व्हॅरिएंट एक्स्टर 19.4 किलोमीटर मायलेज देते. सीएनजीवरची ही कार 27.1 किलोमीटर मायलेज देते. जीएसटीच्या दरात कपात झाल्यानंतर या एसयूव्हीची किंमत ५. ६८ लाखांपासून सुरू होते. कंपनी आणखी ४५ हजारांचे बेनिफिट्स सुद्धा दिले आहे.
Maruti Suzuki Eeco - maruti suzuki ecco ही बेसिक 7 सीटर एमपीव्ही आहे. इकोमध्ये 1.2 लिटर पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 81PS पॉवर आणि 104 Nm टॉर्क जनरेट करते. यात सीएनजी पर्यायदेखील उपलब्ध आहे. ही कार पेट्रोल मोडवर 20kmpl मायलेज देते, तर सीएनजी मोडवर 27km/kg मायलेज देते. maruti suzuki ecco चं इंजिन प्रत्येक ऋतूत चांगला परफॉर्मन्स देतं. इकोमध्ये मोठी स्पेस आहे. यात सात व्यक्ती सहज बसू शकतात. सुरक्षेसाठी या कारमध्ये आता ६ एअरबॅग, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीमसह ईबीडी, चाइल्ड लॉक, स्लायडिंग डोअर्स, ड्रायव्हर आणि पॅसेंजर साइडला एअरबॅग्ज, रिव्हर्स पार्किंग सेन्सर अशी फीचर्स आहेत. या कारची किंमत 5.20 लाख रुपयांपासून सुरू होतं.
बजेटमध्ये कोणती कार आणि SUV बेस्ट?
जर तुम्हाला छोट्या कारपेक्षा थोडी मोठी एसयूव्ही पाहिजे असेल तर तर Tata Punch आणि Hyundai Exter सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे. जर तुमची गरज 7-सीटर फॅमिली कारची असेल, तर Renault Triber किंवा Maruti Suzuki Eeco तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. या ही पलीकडे जाऊन जर मॉडर्न डिझाइन आणि ॲडव्हान्स फीचर्स हवे असतील, तर Nissan Magnite आणि Renault Kiger ची एकदा टेस्ट ड्राईव्ह करून पाहाच.