जेव्हा तुम्ही एखादी बाइक किंवा कार खरेदी करत असतात तेव्हा ऑन रोड किंमतीमध्ये फक्त कार ही एक्स शोरूम किंमत विकत घेत नाही तर यामध्ये तुम्हाला भरमसाठ टॅक्स द्यावा लागतो. यामध्ये जीएसटी, रोड टॅक्स, रजिस्ट्रेशन फी आणि विमा अर्थात इन्शुरन्सचा समावेश आहे. हे सगळे कर प्रत्येक राज्याच्या वाहन धोरणानुसार आहे. त्यामुळे एकाच कारची किंमतही कमी जास्त पाहण्यास मिळते.
advertisement
या ५ राज्यामध्ये कार आहे स्वस्त
हिमाचल प्रदेशची राजधानी शिमलामध्ये कार फक्त 2.5 ते 3 टक्के रोड टॅक्स आकारला जातो. त्या तुलनेत दिल्ली, मुंबई आणि बंगळुरू सारख्या शहरामध्ये 7 ते 12 टक्के कर आकारलाा जातो. त्यामुळे एखादी कार एक्स-शोरूम किंमत 5 लाख रुपये असेल तर ती शिमलामध्ये रोड टॅक्स हा जवळपास 12,500 ते 15,000 रुपये आहे. तर दिल्लीत हाच टॅक्स 35,000 रुपये इतका आहे. जर दिल्ली राहणारे असाल तर शिमल्यात तुम्ही कार खरेदी केली तर 20 ते 25 हजार रुपये वाचतील.
पुदुच्चेरी
पुदुच्चेरी ज्याला पाँडिचेरी असंही म्हटलं जातं हे एकमेव असं शहर आहे जिथे सगळ्या स्वस्त कार मिळते. हा एक केंद्र शासित प्रदेश आहे. या ठिकाणी रोड टॅक्स बराच कमी आहे. या ठिकाणी रोड टॅक्स हा फक्त 4 ते 6 टक्के आहे. तर दिल्ली आणि मुंबईमध्ये 6 ते 7 लाख रुपये ऑन-रोड किंमतीमध्ये मिळणारी कार ही पुदुच्चेरी मध्ये 50 से 70 हजार रुपयांनी स्वस्त मिळते.
चंडीगड आणि गुरुग्राम
चंदीगड हा एक स्वस्त कार खरेदीसाठी चांगला पर्याय आहे. इथं रोड टॅक्स हा 3 ते 6 टक्के आहे. हे शहर दिल्लीपासून जवळ आहे. या ठिकाणी कार या बऱ्याच स्वस्त आहे. दिल्लीपासून नजीकच असलेल्या गुरुग्राममध्ये कार खरेदी करणेही फायदेशीर आहे. गुरुग्राममध्ये रोड टॅक्स हा 5 ते 10 टक्के आहे. जे उत्तर भारतातील इतर शहरापेक्षा कमी आहे.
गंगटोकमध्ये कार स्वस्त
पूर्वोत्तर भारतातील सुंदर शहरापैकी असलेल्या सिक्किमची राजधानी गंगटोकमध्ये कार खरेदी करणे हा एक स्वस्त पर्याय आहे. इथं रोड टॅक्स आणि रजिस्ट्रेशन फारच कमी आहे. गंगटोकमध्ये एक मिड रेंज कार खरेदी करण्यासाठी कमी रोड टॅक्स द्यावा लागतो. या ठिकाणी दिल्ली आणि मुंबईच्या तुलनेत 30 ते 35 हजारांची बचत होते.
महाराष्ट्रात वाहनं का महाग?
महाराष्ट्रामध्ये वाहनं इतर राज्यांच्या तुलनेत महाग वाटण्याचे कारण हे सरकारी कर आणि इतर शुल्कांचा मोठा वाटा आहे. रोड टॅक्स (RTO Tax प्रत्येक राज्याचा रोड टॅक्स वेगवेगळा असतो. महाराष्ट्रात रोड टॅक्सचे दर जास्त आहेत. हा टॅक्स वाहनाच्या किंमतीनुसार, प्रकारानुसार (पेट्रोल, डिझेल, सीएनजी) आणि इंजिन क्षमतेनुसार आकारला जातो. उदा. डिझेल वाहनांवर पेट्रोल वाहनांपेक्षा जास्त टॅक्स असतो. त्यामुळे, वाहनाची एक्स-शोरूम किंमत (कंपनीने ठरवलेली किंमत) जरी कमी असली, तरी रोड टॅक्समुळे ऑन-रोड किंमत (अंतिम किंमत) खूप वाढते. समजा, तुम्ही एखादी पेट्रोल कार खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल आणि त्या कारची किंमत जर १० लाख रुपये असेल तर तुम्हाला ११ टक्के कर भरावा लागेल. इन्शुरन्स अजून बाकी आहे.
जर तुमची कार ही 10 लाख ते 20 लाख किंमत असलेल्या कारवर -12% कर लागेल. आणि जर 20 लाखांपेक्षा जास्त किंमत असलेल्या कारवर 13 टक्के कर लागेल. डिझेल कार जर १० लाख किंमत असेल तर 13 टक्के कर लागेल. 10 लाख ते 20 लाख किंमत असलेल्या कारवर 14 टक्के कर आकारला जाईल. २० लाखांपेक्षा जास्त कारवर १५ टक्के कर लागेल. म्हणजे, महाराष्ट्रात १० लाखांच्या कारसाठी कमीत कमी १ लाख कर द्यावा लागतोय. सीएनजी आणि एलपीजी कारसाठी रोड टॅक्स हा ७ ते ९ टक्के हा कमी आहे.
इतर शुल्क काय?
आता रोड टॅक्स तर तुम्ही भरला. पण कारचं रजिस्ट्रेशन शुल्क, इन्शुरन्स, परमिट शुल्क असे अनेक खर्च लागतात. हे सर्व खर्च एकत्र केल्यावर वाहनाची किंमत आणखी वाढते.