TRENDING:

New Mahindra Thar Roxx ची झलक आली समोर! फेसलिफ्ट की डार्क एडिशन? पाहा

Last Updated:

Mahindra Thar Roxx चा नवा ब्लॅक एडिशन किंवा फेसलिफ्ट लवकरच भारतीय बाजारात येऊ शकतो. डिझर व्हायरल आहे. फॅन्स याच्या स्पोर्ट लूक आणि नवीन फीचर्सची आतुरतेने वाट पाहत आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : Mahindra Thar Roxx इंडियन मार्केटमध्ये लवकरच नव्या अवतारात एंट्री करु शकते. कंपनीने नुकतीच महिंद्रा थार रॉक्ससाठी एक नवीन व्हर्जनचा टीझर जारी केला आहे. हा टीझर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये थार रॉक्सची सिल्हूट दाखवला आहे.
महिंद्रा थार रॉक्स
महिंद्रा थार रॉक्स
advertisement

व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘द स्पॉटलाइट हॅज फाउंड इट्स स्टार’लवकरच येत आहे.' या टीझरवरून, हे थार रॉकचे नवीन ब्लॅक एडिशन किंवा 2026 मध्ये अपेक्षित सौम्य फेसलिफ्ट असण्याची शक्यता आहे.

फेसलिफ्ट की डार्क एडिशन?

महिंद्रा थार रॉक्स, 2024 मध्ये लॉन्च झाली होती. थ्री-डोर थारचा फाइव्ह-डोर व्हर्जन आहे. ही ऑफ-रोड कॅपेसिटीसह फॅमिली यूजसाठी जास्त स्पेस आणि कम्फर्ट प्रदान करते. आता कंपनी या प्रसिद्ध एसयूव्हीला आणखी आकर्षक बनवण्यासाठी नवीन अपडेट तयार केला आहे.

advertisement

Toyota चा धमाका, भारतात लाँच केली पहिली इलेक्ट्रिक SUV; 543 किमी बिनधास्त फिरा!

डीझरमध्ये दाखवलेय की, डार्क थीम आणि ब्लॅक-आउट एलिमेंट्सवरुन स्पष्ट जाहीर होते की, ही स्पेशल एडिशन असू शकते. विशेषतः डार्क एडिशन किंवा ब्लॅक एडिशन येण्याची शक्यता जास्त आहे. महिंद्राने यापूर्वीही स्कॉर्पियो-एन आणि एक्सयूव्ही700 मध्ये असेच ऑल-ब्लॅक थीमचे स्पेशल एडिशन लॉन्च केले आहेत.

advertisement

टीझरमध्ये काय दाखवले आहे?

टीझरनुसार, नवीन व्हर्जन पूर्णपणे ब्लॅक-आउट ट्रीटमेंटसह येईल. त्यात काळे अलॉय व्हील्स, काळे बंपर, काळे ग्रिल, काळे लोगो आणि कदाचित आतील भागात काळ्या लेदर किंवा फॅब्रिक अपहोल्स्ट्री देखील असू शकते. काही रिपोर्ट्समध्ये सी-पिलर लपवण्यासाठी काळ्या रंगाचा जॉब वापरल्याचे देखील सुचवले आहे, ज्यामुळे तो अधिक आक्रमक लूक देतो.

advertisement

लवकरच भारतात कमबॅक करणार क्रेटा-नेक्सॉनची शत्रु! SUV मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ

इंजिन तेच, पण डिझाइन नवी 

एक्सटीरियरमध्ये स्पोर्टियर टचसाठी काही क्रोम पार्ट्सला ब्लॅकने रिप्लेस केले जाऊ शकतात. खरंतर मॅकेनिकल चेजेंसची आशा कमी आहे. इंजीन ऑप्शनमध्ये कोणताही बदल होणार नाही. यामध्ये 2.0-लीटर टर्बो पेट्रोल आणि 2.2 लिटर डिझेलचा समावेश आहे. जो क्रमशः मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह उपलब्ध आहे. किंमत कमी करण्यासाठी 1.5-लीटर डीजल इंजनही दिली जाऊ शकतं अशीही शक्यता वर्तवली जातेय.

advertisement

ही फेसलिफ्ट असेल तर बदल जास्त होऊ शकतो. 2026 मध्ये थार रॉक्सला मिडल लाइफ अपडेट मिळणार असल्याचं बोललं जात होतं. ज्यामध्ये फ्रंट ग्रिल, हेडलाइट्स, बंपर्स आणि इंटीरियरमध्ये काही नवीन फीचर्स सामिल होऊ शकतात. नुकतेच कॅमोफ्लाज्ड टेस्ट म्यूल्सला भारतीय रस्त्यांवर दिसले आहेत. जे मोठे अपडेटकडे इशारा करतात.

मार्केटमध्य पहिल्यापासून डिमांड 

Mahindra Thar Roxx पहिल्यापासूनच भारतीय बाजारात सर्वात जास्त मागणी असलेली लाइफस्टाइल एसयूव्हीमधून एक आहे. याची मजबूत बिल्ड क्वालिटी, 4×4 कॅपेबिलिटी, हाय ग्राउंड क्लियरेन्स आणि मॉडर्न फीचर्सर जसं की, 10.25-इंच इंफोटेनमेंट सिस्टम, पॅनोरमिक सनरुफ, लेव्हल -2 ADAS आणि रियर एसी व्हेंट्स याला तरुण आणि अडव्हेंचर लव्हर्सच्या आवडीची बनवते.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
गणेश जयंतीला बनवा उकडीचे मोदक, या पद्धतीनं अजिबात नाही फुटणार, रेसिपीचा Video
सर्व पहा

महिंद्राने या डिझरने बाजारात धुमाकूळ घातला आहे. ब्लॅक एडिशन असो किंवा फेसलिफ्ट, थार रॉक्सचा हा नवीन अवतार ऑफ-रोडर्स आणि स्टाईल स्टेटमेंट बनवणाऱ्यांना नक्कीच अधिक आकर्षक वाटेल. कंपनी लवकरच अधिक डिटेल्स शेअर करेल अशी अपेक्षा आहे. सध्या तरी, थार रॉक्सचे चाहते "स्टार" अखेर प्रसिद्धीच्या झोतात येण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

मराठी बातम्या/ऑटो/
New Mahindra Thar Roxx ची झलक आली समोर! फेसलिफ्ट की डार्क एडिशन? पाहा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल