छोट्या कारचे दर होतील कमी
GST मध्ये कर रचनेत बदल झाला तर 4 मीटरपेक्षा कमी लांबीच्या गाड्या ज्या 1200cc पेट्रोल आणि 1500cc डिझेल इंजिन असलेल्या गाड्या असतील. या सेगमेंटमध्ये विक्री कमी होत चालली आहे. कारण, ग्राहकांना आता मोठ्या गाड्या आणि दमदार SUV घेण्याकडे कल वाढला आहे. अलीकडे कारच्या किंमती एसयूव्ही उपलब्ध उपलब्ध आहे. नवीन GST दरात छोट्या कारच्या किंमतीवर परिणाम होतील. त्यामुळे छोट्या कारचे दर हे कमी होतील. मारुती सुझुकी, हुंदई सारख्या कार उत्पादक छोट्या कार उत्पादक अग्रेसर आहे.
advertisement
मोठ्या कारचं काय होईल?
केंद्र सरकारने GST कर रचनेत बदल केला तर मोठ्या गाड्यांच्या किंमती वाढतील का अशी शक्यता निर्माण झाली आहे. पण ज्या गाड्यांचं मोठं इंजिन आहे त्या गााड्यांवर जवळपास 50 टक्के म्हणजेच, 28 टक्के GST आणि 22 टक्के सेस ) कर आकारला जाऊ शकतो. ज्याची मर्याद ही 40 टक्क्यांपर्यंत आणली जाऊ शकते. या व्यतिरिक्त लेवी लावली जाईल, ज्यामुळे टोटल टॅक्स 43-50 टक्के राहिल.
विमा होईल स्वस्त
हेल्थ आणि लाइफ इन्श्योरन्स प्रीमियमवर GST 18% वरून 5% टक्के करण्यात येणार आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळेल. २-स्लॅब GST स्ट्रक्चरमध्ये बदल कऱण्याचा सरकारचा विचार आहे. भविष्यात केंद्र सरकारकडून चार-स्लॅब प्रणाली (5 टक्के, 12 टक्के, 18 टक्के आणि 28 टक्के) रद्द करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे फक्त 5 टक्के आणि 18 टक्के कर प्रणाली तयार करणार आहे. 28 टक्के स्लॅब आता रद्द करण्याचा सरकारचा विचार आहे.
