TRENDING:

ऑफिसला जाण्यासाठी बेस्ट अशी बजेट बाइक, मायलेजही 69 किमी; किंमत तर आणखी कमी!

Last Updated:

125cc सेगमेंटमध्ये तुम्ही जर एखादी मायलेज बेस्ट बाइक पाहणारा असेल तर दोन मस्त पर्याय आहे. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
वाढते इंधनाचे दर पाहता आज प्रत्येक जणांचा स्वस्त मस्त आणि चांगली मायलेज देणारी बाइक खरेदी करण्याकडे जास्त कल असतो. त्यामुळे आजही भारतामध्ये  100cc-125cc इंजिन असलेल्या बाइकची विक्री ही सर्वाधिक आहे. ग्रामीण आणि शहरी भागामध्ये सुद्धा या मायलेज बेस्ट बाइकची जास्त मागणी असते. ऑफिसला जाणे असेल किंवा रोजचा वापर असेल, यासाठी या बाइक पहिली पसंती असतात. 125cc सेगमेंटमध्ये तुम्ही जर एखादी मायलेज बेस्ट बाइक पाहणारा असेल तर दोन मस्त पर्याय आहे.
News18
News18
advertisement

Hero Super Splendor

हिरो सुपर स्प्लेंडर ही गेल्या अनेक वर्षांपासून भारतीयांची फेव्हरट अशी बाइक राहिली आहे. मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये हिरो स्प्लेंडर ही हमखास वापरलेली बाइक आहे. हिरोनं सुपर स्प्लेंडरही १२५ सीसी सेगमेंटमध्ये बाइक लाँच केली.  या बाइकमध्ये 124.7cc इंजिन दिलं आहे जे10.7bhp आणि 10.6Nm चा टॉर्क जनरेट करतो. यामध्ये 5 स्पीड गिअरबॉक्स दिला आहे.

advertisement

एका लिटरमध्ये ही बाइक 69 km इतकं मायलेज देते.  या बाइकमध्ये  फ्रंट टायरामध्ये 240mm Disc आणि रिअर टायरामध्ये 130mm ड्रम ब्रेक दिलं आहे. या बाइकचे18 इंचाचे टायर्स आहे. रोजच्या वापरासाठी ही बाइक सगळ्या उत्तम आहे. या बाइकची किंमत  86128 रुपयांपासून सुरू होते.

advertisement

Honda Shine 125

होंडा शाइन ही देशात १२५ सीसी सेगमेंटमध्ये सर्वाधिक विक्री होणारी बाइक आहे. रोजच्या वापरासाठी ही बाइक एक बेस्ट ऑप्शन आहे. या बाइकमध्ये 124 cc चं SI इंजिन दिलं आहे. जे 7.9 kW ची पॉवर आणि 11 Nm इतका टॉर्क जनरेट करतो.  या बाइकमध्ये 5 स्पीड गिअरबॉक्स दिला आहे.  ।ARAI नुसार, ही बाइक एक लीटर पेट्रोलमध्ये 65 किलोमीटर इतकं मायलेज देते. बाइकच्या फ्रंटमध्ये 240mm Disc आणि रियरमध्ये 130 mm ड्रम ब्रेक दिलं आहे.  या बाइकमध्ये 18 इंचाचे टायर्स दिले आहे. या बाइकची एक्स-शो रूम किंमत 85 हजारांपासून सुरू होते.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
महिलांनो व्यवसाय सुरू करायचाय? पुण्यात इथं मिळतंय मोफत मार्गदर्शन, Video
सर्व पहा

ऑफिस आणि रोजच्या वापरासाठी ही बाइक एकदम बेस्ट आहे. तुमच्या तुमच्या गरजेनुसार बाइकची निवड करू शकता. या दोन्ही बाइकचे सीट हे आरामदायक आहे. विशेष म्हणजे, दोन्ही गाड्यांना कमी मेंटनेन्स खर्च लागतो.

मराठी बातम्या/ऑटो/
ऑफिसला जाण्यासाठी बेस्ट अशी बजेट बाइक, मायलेजही 69 किमी; किंमत तर आणखी कमी!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल