उद्योजिका राजश्री गागरे यांनी 2018 साली समर्थ बहुउद्देशीय संस्थेची स्थापना केली. संस्थेच्या माध्यमातून अनेक महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शन आणि प्रशिक्षण विनामूल्य दिले जाते. राजश्री गागरे यांनी सांगितलं की, माझ्या व्यवसायाची सुरुवात करताना मला योग्य मार्गदर्शन मिळणे खूप कठीण होते. त्यामुळे मी व्यवसाय यशस्वी केल्यानंतर या संस्थेची सुरुवात केली.
advertisement
त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक महिलांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. राजश्री गागरे देशातील पहिली चुंबक बनवणाऱ्या Magnaplast Technologies कंपनीच्या त्या MD आहेत. त्यांनी बंद पडत असलेली कंपनी खरेदी करून ती यशस्वी करून दाखवली आहे. त्यांच्या कंपन्यांचा वार्षिक टर्नओव्हर 25 कोटी इतका आहे.
समर्थ बहुउद्देशीय संस्थेच्या मार्गदर्शनाखाली 1500 पेक्षा जास्त महिला सदस्यांनी आपला व्यवसाय दुपटीने वाढवला आहे. संस्थेत व्यवसाय सुरू करण्यापासून उत्पादन विकास आणि आर्थिक नियोजनापर्यंत सर्व आवश्यक मार्गदर्शन आणि प्रशिक्षण मोफत दिलं जातं. यामुळे अनेक महिलांनी आपला व्यवसाय वाढवण्यास मदत झाली आहे. या संस्थेत महाराष्ट्रभरातून महिला जोडल्या गेल्या आहेत. तसेच या संस्थेमार्फत अनेक महिलांच्या हाताला रोजगार सुद्धा मिळवून दिला आहे.