Pune : पीएमआरडीएची महत्त्वपूर्ण घोषणा! 'हा' प्रकल्प होणार सुरु,थेट फायदा ग्रामीण भागाला

Last Updated:

PMPML Hand Signal Bus Stop PMRDA : पीएमआरडीए ग्रामीण भागातील प्रवाशांच्या सोयीसाठी हात दाखवा आणि बस थांबवा उपक्रम लवकरच राबविणार आहे. हा उपक्रम प्रवाशांना बस थांबवण्यासाठी सोयीस्कर ठरेल.

News18
News18
पुणे : प्रवाशांच्या सोयीसाठी पीएमआरडीए आणि जिल्ह्यातील नागरिकांसाठी पीएमपी बससेवा आता एक नवीन उपक्रम लवकरच सुरू करणार आहे.  या उपक्रमाचे नाव आहे 'हात दाखवा आणि बस थांबवा'. या उपक्रमाचा मुख्य उद्देश वाड्या-वस्त्यांवर राहणाऱ्या नागरिकांना प्रवास अधिक सोपा करणे आहे.
जिल्ह्याचा बराचसा भाग आता पीएमआरडीएच्या हद्दीत आला आहे. या भागात पीएमपीची बससेवा सुरु झाली आहे. मात्र, अनेक वाड्या-वस्त्यांना अजूनही अधिकृत बस थांबा नाही. त्यामुळे येथे राहणाऱ्या नागरिकांना बस पकडण्यासाठी गावाच्या मुख्य थांब्यांपर्यंत जावे लागते. काही वेळा ही अंतर खूपच जास्त असते आणि नागरिकांना तेथपर्यंत पायपीट करावी लागते.
अनेक वाड्या बसच्या रस्त्याच्या जवळ असूनही अधिकृत थांबा नसल्यामुळे बस त्या ठिकाणी थांबत नाही. परिणामी रहिवाशांना प्रवासासाठी मुख्य थांब्यापर्यंत जावे लागते जे त्यांच्या दैनंदिन प्रवासासाठी त्रासदायक ठरते. या समस्येवर उपाय म्हणून पंकज देवरे यांनी 'हात दाखवा आणि बस थांबवा' हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमात वाड्या-वस्त्यांवर राहणाऱ्या नागरिकांना बस थांबवण्यासाठी फक्त हात दाखवायचा आहे आणि बस थांबेल. यामुळे नागरिकांना मुख्य गावाच्या थांब्यापर्यंत जाण्याची गरज कमी होईल आणि प्रवास अधिक सोपा आणि सुरक्षित होईल.
advertisement
पूर्वीपासूनच एका गावामध्ये चार ते पाच वाड्या असतात. बस थांबा मुख्य रस्त्यावर असतो, परंतु वाड्या गावठाणाच्या आत किंवा आजूबाजूला असतात. काही वाड्या मुख्य रस्त्यालगत असतात पण त्यांच्याकडे पोस्ट, शाळा, सरकारी दवाखाना आणि मुख्य थांबा मुख्य गावात असतो. यामुळे काही नागरिकांना बस पकडण्यासाठी अधिकृत थांब्यापर्यंत जावे लागते.
या नवीन उपक्रमामुळे ही पायपीट थांबेल. वाड्या-वस्त्यांवर बस थांबविण्याची सुविधा आल्यामुळे नागरिकांना बस मिळवण्यासाठी लांब अंतर चालण्याची गरज नाही. बस रस्त्यालगत वाड्यांवर थांबवली जाईल आणि प्रवाशांना प्रवासात मोठा सोयीचा अनुभव मिळेल. यामुळे विशेषतहा ज्यांना दररोज शाळा, दवाखाना किंवा कामासाठी बस वापरावी लागते. त्यांना मोठा फायदा होणार आहे.
मराठी बातम्या/पुणे/
Pune : पीएमआरडीएची महत्त्वपूर्ण घोषणा! 'हा' प्रकल्प होणार सुरु,थेट फायदा ग्रामीण भागाला
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement