Rohini Kahadse: खडसेंच्या जावयाला दिलासा मात्र लेकीच्या मागे चौकशीचा ससेमिरा, काय आहे प्रकरण?
- Published by:Prachi Amale
Last Updated:
मोबाईलमधील व्हॅाटसॲप डाटा म्हणजे पुरावा नष्ट केल्याप्रकरणी रोहिणी खडसेंची पुणे पोलीसांकडून चौकशी सुरू आहे.
पुणे : पुण्यातील कथित रेव्ह पार्टी प्रकरणामुळे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना जामीन मंजुर झाला आहे. मात्र अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाही. आता सिमकार्ड बदली प्रकरणी गुन्हे शाखेकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि प्रांजल खेवलकर यांच्या पत्नी रोहिणी खडसेंची पोलिस आयुक्तालयात चौकशी सुरू आहे.
प्रांजल खेवलकर यांच्या पत्नी रोहिणी खडसे यांनी या प्रकरणातील काही महत्त्वाच्या पुराव्यांमध्ये छेडछाड केल्याचा पुणे पोलिसांना संशय आहे. प्रांजल खेवलकर यांना वाचवण्यासाठी रोहिणी खडसे यांनी काही कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे नष्ट करण्याचा किंवा त्यात बदल करण्याचा प्रयत्न केला, असा पोलिसांनी दावा आहे. पण अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. मोबाईलमधील व्हॅाटसॲप डाटा म्हणजे पुरावा नष्ट केल्याप्रकरणी रोहिणी खडसेंची पुणे पोलीसांकडून चौकशी सुरू आहे.
advertisement
रोहिणी खडसेंवर काय आरोप?
पुणे पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या माहितीनुसार, माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये ‘सोनार’ नावाच्या व्यक्तीच्या नावे असलेले सिमकार्ड आढळून आले आहे. या सिमकार्डच्या वापरातून छेडछाड करून पुरावे नष्ट करण्यात आल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
प्रांजल खेवलकर अटकेत असताना सोनार नावाच्या व्यक्तीने त्याच्या नावावर असलेले सीम कार्ड हरवल्याचा दावा करत त्याच नंबरचे दुसरे सीम कार्ड खरेदी केले. ते कार्ड नवीन मोबाईलमधे टाकले आणि त्या मोबाईलच्या माध्यमातून त्या नंबरचा सगळा डेटा डीलीट केला. सोनारने केलेले हे कृत्य पुरावे नष्ट करण्याचा प्रकार असल्याचं पुणे पोलीसांच म्हणणं आहे. सोनार हा जळगाव जिल्ह्यातील असून हे कृत्य त्याने रोहिणी खडसेंच्या सांगण्यावरुन केल्याची माहिती पोलिसांना दिली असा पोलीसांचा दावा आहे.मात्र, या प्रकरणात महत्त्वाचा ठरत असलेला ‘सोनार’ नेमका कोण आहे? याबाबत अजूनही संभ्रम कायम आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी रोहिणी खडसे यांना बोलवण्यात आल्याची माहिती आहे.
Location :
Pune (Poona) [Poona],Pune,Maharashtra
First Published :
October 06, 2025 1:48 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Rohini Kahadse: खडसेंच्या जावयाला दिलासा मात्र लेकीच्या मागे चौकशीचा ससेमिरा, काय आहे प्रकरण?