'माझ्याशी शरीरसंबंध ठेव', मुंबईत हायप्रोफाईल ब्लॅकमेलिंग, केंद्र सरकारचा वकील जाळ्यात, घरात घुसून...
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
मुंबईतील गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक हाय प्रोफाइल ब्लॅकमेलिंगचं प्रकरण उघडकीस आलं आहे. देशाचं आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये प्रतिनिधित्व करणाऱ्या एका प्रसिद्ध वकिलाला तरुणीने ब्लॅकमेलिंगच्या जाळ्यात अडकवलं आहे.
मुंबई: मुंबईतील गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक हाय प्रोफाइल ब्लॅकमेलिंगचं प्रकरण उघडकीस आलं आहे. देशाचं आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये प्रतिनिधित्व करणाऱ्या एका प्रसिद्ध वकिलाला तरुणीने ब्लॅकमेलिंगच्या जाळ्यात अडकवलं आहे. वकिलाचे आक्षेपार्ह फोटो मॉर्फ करून ते व्हायरल करण्याची धमकी देत, तरुणीने त्यांच्याकडून तब्बल दीड कोटी रुपये उकळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी वकिलाने गोरेगाव पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी तरुणीसह तिच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित वकील हे केंद्र सरकारसाठी एका अत्यंत उच्च पदावर काम करतात. त्यांनी जी-२० परिषदसह इतर आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक महत्त्वाच्या परिषदांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. हे प्रकरण हायप्रोफाईल असल्याने मुंबई पोलिसांनी तत्काळ याची गंभीर दखल घेऊन कारवाई सुरू केली आहे.
इन्स्टाग्रामवर चॅटींग
प्राथमिक तपासानुसार, या वकिलाची आणि तरुणीची ओळख गेल्या वर्षी मित्रांमार्फत झाली होती. सुरुवातीला ही तरुणी वकिलाच्या मित्रांसोबत त्याच्या घरी आली होती. त्यानंतर दोघांनी इंस्टाग्रामवर चॅटिंग करण्यास सुरुवात केली. कालांतराने त्यांनी मोबाईल नंबरची देवाणघेवाण करून बोलणे सुरू केले आणि त्यांची ओळख वाढू लागली.
advertisement
ओळख घट्ट झाल्यावर या तरुणीने वेगवेगळ्या कारणांसाठी वकिलाकडे पैशांची मागणी सुरू केली. सुरुवातीला वकिलाने तिला अंदाजे २० ते ३० लाख रुपये दिले. मात्र, नंतर जेव्हा वकिलाने दिलेले पैसे परत मागितले, तेव्हा तरुणीने नकार दिला.
शरीरसंबंधासाठी आग्रह आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी
पैसे परत करण्यास नकार दिल्यावर, या तरुणीने वकिलाला धमकावण्यास सुरुवात केली. तिने दोघांच्या भेटीवेळचे खासगी फोटो मॉर्फ केले आणि ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. एवढेच नाही, तर तिने वकिलावर बलात्काराची खोटी तक्रार दाखल करण्याची धमकी देऊन त्यांना मानसिक त्रास दिला.
advertisement
या घटनेदरम्यान, तरुणीने मध्यंतरी वकिलाच्या घरी येऊन त्यांच्याशी शरीरसंबंध ठेवण्याचाही प्रयत्न केल्याचा आरोप वकिलाने केला. 'माझ्यासोबत फिरायला चल' असा हट्टही तिने धरला होता. वकिलांनी विवाहित असल्याचे आणि त्यांना लहान मुलगी असल्याचे सांगितले तरीही ही तरुणी शारीरिक लगट करण्याचा प्रयत्न करत राहिली, असं वकिलाने तक्रारीत म्हटलं आहे.
अखेरीस, या सर्व धमक्या आणि ब्लॅकमेलिंगच्या माध्यमातून तरुणीने वकिलाकडून तब्बल दीड कोटी रुपये उकळले. डोक्यावरून पाणी गेल्यावर या वकिलाने गोरेगाव पोलीस ठाण्यात तरुणी आणि तिच्या कुटुंबीयांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास केला जात आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 06, 2025 1:54 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
'माझ्याशी शरीरसंबंध ठेव', मुंबईत हायप्रोफाईल ब्लॅकमेलिंग, केंद्र सरकारचा वकील जाळ्यात, घरात घुसून...