हॅलो, उपचारासाठी पैसे पाठवलेत, चिपळूणच्या हवाई दलातील निवृत्त अधिकाऱ्यासोबत जे घडलं ते तुमच्यासोबतही घडू शकतं

Last Updated:

चिपळूणमधील अरुण बापट यांना मित्राच्या आवाजात फोन येऊन उपचारासाठी पैसे मागितले गेले आणि 1 लाख 15 हजारांची सायबर फसवणूक झाली. पोलिसांनी सतर्कतेचं आवाहन केलं.

News18
News18
हॅलो... हॅलो....हा उपचारासाठी पैसे पाठवलेत, असं म्हणत एक फोन आला, या फोननं चिपळूणमधील हवाई दलातील निवृत्त अधिकाऱ्याचं आयुष्यच बदलून गेलं. हा फोन उचलला, वाटलं समोरुन मित्र बोलतोय, कारण आवाज तसाच हुबेहुब, त्या आवाजाला ते भुलले आणि फसले. त्या एका फोननं हवाई दलातील निवृत्त अधिकाऱ्याला मोठा धक्काच बसला. एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. त्याला दोन मिनिटं समजलंही नाही आपल्यासोबत काय गेम झाला आहे. जेव्हा समजलं तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
हवाई दलातील निवृत्त अधिकाऱ्याला गंडवलं
उपचारासाठी पैसे पाठवल्याचा बहाणा करून हवाई दलातील माजी अधिकाऱ्याला सायबर फ्रॉड करणाऱ्यांना सपशेल फसवलं. मित्राचा आवाज काढून त्याच्या आवाजात फोन लावला आणि उपचारासाठी पैसे पाठवण्याचा बहाणा देत खात्यावरुन पैसे काढून घेतले. आपली फसवणूक झाली हे समजलं तोपर्यंत खूप उशीर झाला होता. खात्यावरुन रक्कम गेली होती. लाखो रुपये गेले होते. जे त्यांच्यासोबत घडलं ते तुमच्यासोबतही घडू शकतं.
advertisement
पैसे पाठवण्याच्या बहाण्याने खातं रिकामं केलं
या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मूळ पुणे बाणेर इथले रहिवासी असलेले अरुण बापट यांना 1 ऑक्टोबर रोजी एक फोन आला. मित्राच्या आवाजात तुम्हाला उपचारासाठी पैसे पाठवले आहेत असं सांगितलं. ही रक्कम ऑनलाईन पद्धतीने त्याने उकळली आहे. 1 लाख 15 हजार रुपयांची रक्कम त्यांच्या खात्यावरुन उकाळली आहे. या प्रकरणी बापट यांनी तातडीनं पोलीस ठाण्यात धाव घेत संपूर्ण प्रकार सांगितला. अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
चिपळूण पोलिसांचं आवाहन
दरम्यान या प्रकरणानंतर पोलिसांना सर्वांना आवाहन केलं आहे. वेगवेगळ्या मार्गाने सायबर फ्रॉड सुरू झाले आहेत. OTP, ऑनलाईन पैसे पाठवणे, KYC किंवा बँक ट्रान्सफर यासारख्या गोष्टींचा आधार घेऊन सायबर फ्रॉड सुरू आहेत. त्यामुळे अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. कुणालाही तुमची माहिती OTP, आधार नंबर काहीही देऊ नका. ऑनलाईन खरेदी करताना सावध राहा असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.
मराठी बातम्या/मनी/
हॅलो, उपचारासाठी पैसे पाठवलेत, चिपळूणच्या हवाई दलातील निवृत्त अधिकाऱ्यासोबत जे घडलं ते तुमच्यासोबतही घडू शकतं
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement