Pune : स्वस्त दरात 'सेकंड हँड' वाहन खरेदी करायचे का? पुण्यात'या' दिवशी होणाऱ्या लिलावात सहभागी व्हा
Last Updated:
Pune RTO Vehicle Auction : स्वस्त दरात सेकंड हँड वाहन खरेदी करायचे आहे का. तर पुण्यात या दिवशी होणाऱ्या शासकीय लिलावात नक्की सहभागी व्हा.
पुणे : जर तुम्हाला स्वस्त दरात सेकंड हँड वाहन हवे असेल तर तुम्हाला येत्या 15 ऑक्टोबरला होणाऱ्या शासकीय ई-लिलावात सहभागी व्हावे लागेल. पुण्यात आरटीओने काही वाहने जप्त केली आहेत. ही वाहने मुख्यत्वे नियमांचे उल्लंघन केल्यामुळे आरटीओच्या पथकाने ताब्यात घेतली होती. मात्र ही वाहने वाहनधारकांकडून दंडात्मक रक्कम भरून ताब्यात घेण्यास टाळाटाळ केली जात असल्याने आता ई-लिलावाचा निर्णय घेतला आहे.
या लिलावात दुचाकी, चारचाकी, ट्रक, मिनीबस, बस आणि स्लीपर बस यासह विविध प्रकारची वाहने आहेत. लिलाव टप्प्याटप्प्याने होणार असून वाहनधारक, चालक किंवा वाहनाशी संबंधित इतर व्यक्तींना लिलावाच्या आधी दंड भरून किंवा हक्क दाखवून ही वाहने ताब्यात घेता येऊ शकतात. लिलावानंतर कोणतीही मागणी किंवा हरकत स्वीकारली जाणार नाही असे आरटीओने स्पष्ट केले आहे.
advertisement
वाहनधारकांना दंड भरून वाहने ताब्यात घेण्यासाठी पूर्वीच मुदत देण्यात आली होती. मात्र, काही वाहनधारकांनी वाहनं सोडवण्यास टाळाटाळ केली म्हणून आता ई-लिलावाचा निर्णय झाला आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांनी ही माहिती दिली आहे.
पुणे RTO च्या ई-लिलावाची तारीख 15 ऑक्टोबर असून सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत हे असणार आहे. वाहन पाहण्याची मुदत 6 ते 13 ऑक्टोबर हडपसर, शेवाळवाडी आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे येथे आहे. सहभागी होण्यासाठी ऑनलाइन नोंदणी http://www.eauction.gov.in वर करावी लागेल. दुचाकीसाठी 10,000 आणि ट्रक/बससाठी 50,000 रुपये डिमांड ड्राफ्ट अनामत रक्कम आवश्यक तसेच डीएससी बंधनकारक आहे.
advertisement
हा लिलाव सर्व वाहनप्रेमी, सेकंड हँड वाहन खरेदी करणार्यांसाठी मोठी संधी आहे. या लिलावात सहभागी होऊन स्वस्त दरात वाहन खरेदी करता येईल. वाहन जप्त केलेली असल्यामुळे ही वाहनं किंचित कमी किंमतीत मिळू शकतात. इच्छुकांनी वेळेत नोंदणी करून आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावी. तसेच अनामत रक्कम देऊन लिलावात बोली लावावी.
या लिलावामुळे नियम मोडणाऱ्या वाहनधारकांना शिक्षा होईल आणि योग्य व्यक्तींना वाहन मिळण्याची संधी मिळेल. त्यामुळे लिलावामध्ये सहभागी होण्यापूर्वी सर्व नियम आणि अटी काळजीपूर्वक वाचणे महत्त्वाचे आहे. संपूर्ण लिलाव ऑनलाइन पार पाडला जाईल, त्यामुळे इच्छुकांना खाजगी किंवा ऑफलाइन प्रक्रियेची गरज नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 06, 2025 2:57 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune : स्वस्त दरात 'सेकंड हँड' वाहन खरेदी करायचे का? पुण्यात'या' दिवशी होणाऱ्या लिलावात सहभागी व्हा