'20 मिनिटं तर जाहिरात, सीरियल कधी बघायची'; पुणेकर आजींची थेट खासदारांकडे तक्रार, VIDEO

Last Updated:

Pune Old Women Video : मालिका कमी आणि जाहिरातीच जास्त, बघायचं काय असं म्हणत पुणेकर आजींनी थेट खासदारांकडेच तक्रार केली. आजींचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

मुंबई : टेलिव्हिजन मालिका या महिला वर्गांच्या गळ्यातील ताईत असतात. मराठी मालिकांवर महिला वर्गांचं विशेष प्रेम. वेळात वेळ काढून, काम करत करत माहिला आवर्जून मालिका पाहतात. अर्ध्या तासाच्या एका मालिकेनुसार अनेक महिलांनी त्यांचं अनेक वर्षांचं कामाचं टाइमटेबल बनवलं आहे. पण बदलत्या काळानुसार आता एका एपिसोडमध्ये मालिका कमी आणि जाहिरातीच जास्त दाखवल्या जात आहे. एका पुणेकर आजींनी याची तक्रार थेट खासदारांकडे केली आहे.
टीव्ही सिरीयलच्या मालिकेत नुसती जाहिरात असते, त्यासाठी काय तर करा, असं सांगत एका आजींनी खासदार सुप्रिया सुळेंकडे अजबच मागणी केली. अशा अजब मागणीवर खासदार सुप्रिया सुळेंनाही हसू आवरलं नाही मात्र सुप्रिया सुळेंनी आश्वासन दिलं की नक्की काय तरी करू. यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
आजींचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात त्या खासदार सुप्रिया सुळे यांना भेटतात आणि म्हणतात, 'माझी एक तक्रार आहे, आम्ही म्हातारी माणसं घरात बसून असतो. केबलला इतके पैसे भारायचे पण त्यात जाहिरातीच खंडीभर असतात, काय बघायचं सांगा. 10 मिनिटांचा कार्यक्रम असतो आणि बाकीची 20 मिनिटं तर जाहिरातीच असतात.'
advertisement
आजी पुढे म्हणाल्या, 'मी कुठं तक्रार करू हेच मला सुचत नाही. योगायोगानं आता तुम्ही आलात त्यामुळे मला जरा बोलायला चान्स मिळाला. त्यावर तुम्हाला काहीतरी करता आलं तर बघा, तेवढी मेहरबानी होईल. कारण आमचा वेळ जात नाही. त्या जाहिराती बघून वैताग आला. खरंच सांगते तुम्हाला, एक जाहिरात दोन दोन वेळा दाखवतात.'
advertisement
यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'पूर्ण एपिसोड दाखवत नाहीत का?' त्यावर आजी म्हणाला, 'नाही, थोडसंच दाखवतात. 15 मिनिटांची तर सीरियल असते, तशी 30 मिनिटांची असते.' यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, '22 मिनिटांची असते, 22 मिनिटांचा एक एपिसोड असतो'. 'तेवढी मेहबानी करून करून घ्या', अशी विनंती आजींनी केली. 'मी नक्की विचार करते', असं आश्वासन सुप्रिया सुळे यांनी आजींना दिलं.
मराठी बातम्या/मनोरंजन/
'20 मिनिटं तर जाहिरात, सीरियल कधी बघायची'; पुणेकर आजींची थेट खासदारांकडे तक्रार, VIDEO
Next Article
advertisement
एकही सिनेमा केला नाही, तरीही बी टाऊनमध्ये सर्वात श्रीमंत; संपत्तीत शाहरुखलाही सोडलं मागे
एकही सिनेमा केला नाही, तरीही बी टाऊनमध्ये सर्वात श्रीमंत; शाहरुखलाही सोडलं मागे
    View All
    advertisement