ST Bus Andolan: ऐन दिवाळीत प्रवाशांचे हाल! 13 ऑक्टोबरपासून एसटी कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, मागण्या काय?
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
ST Bus Andolan News: महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेसने एस.टी. कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक व इतर मागण्यांकडे एस.टी. प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षाविरोधात ठिय्या आंदोलनाची हाक दिली आहे.
मुंबई: महागाई भत्ता फरक, वेतनवाढ फरक रक्कम, दिवाळी भेट रक्कम, सण उचल आदी मागण्यांचे फलक व पेटती मशाल हातात घेऊन राज्यातील 500 पेक्षा जास्त एसटीतील कामगार प्रतिनिधींनी 13 ऑक्टोबर पासून होणाऱ्या आंदोलनाच्या टीझरचे सादरीकरण केले असून एसटी प्रशासनाला गंभीर इशारा दिला आहे. मुदती पूर्वी प्रश्न सुटले नाहीत तर आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिला आहे.
महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेसने एस.टी. कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक व इतर मागण्यांकडे एस.टी. प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षाविरोधात ठिय्या आंदोलनाची हाक दिली आहे. 13 ऑक्टोबर 2025 रोजी रात्रीपासून राज्यव्यापी ठिय्या आंदोलन सुरू होणार असून. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे. एस.टी. कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता मिळावा, 2016 ते 2020 या काळातील वेतनवाढ तत्काळ लागू करावी, तसेच 48.9 टक्के महागाई भत्त्याचा फरक तातडीने द्यावा, या मागण्यांसह इतर मुद्द्यांवर निर्णय न झाल्याने हा संघर्ष उभारला जात आहे.
advertisement
आज दादरच्या टिळक भवन येथील सभागृहात एसटी कामगारांच्या प्रलंबित मागण्यासाठी 12 ऑक्टोबर रोजी रात्री बारा वाजल्यापासून होणाऱ्या बेमुदत आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या टीझर सादरीकरण सभेत बोलत होते. सभेला राज्य भारतातून मोठ्या संख्येने प्रतिनिधी उपस्थित होते. ते पुढे म्हणाले की, एसटी कामगारांच्या चळवळीच्या इतिहासात पहिल्यांदाच मशाल मोर्चा काढण्यात येणार असून तो 12 ऑक्टोबरच्या रात्री बारा वाजल्यापासून होणार असून या आंदोलनाचे रूपांतर पुढे बेमुदत ठिय्या आंदोलनात होणार असल्याने त्याचा प्रवाशी वाहतुकीवर परिणाम होऊ व प्रवाशांची गैरसोय होऊ नये ही आमची इच्छा असून प्रशासनाने सुद्धा याकडे गंभीरतेने लक्ष दिले पाहिजे. असेही बरगे यांनी यावेळी सांगितले.
advertisement
प्रलंबित मागण्याकडे लक्ष वेधताना ते म्हणाले की, 2016 पासूनचा एसटी कामगारांचा 1100 कोटी रुपयांचा महागाई भत्त्याचा फरक मिळालेला नसून वेतनवाढ फरकाची 2318 कोटी रुपयांची रक्कम देण्यात आलेली नाही.या शिवाय 17,000 हजार रुपये इतकी रक्कम दिवाळी भेट म्हणून देण्यात आली पाहिजे. 12,500 सण उचल मिळाली पाहिजे अशा अनेक प्रकारच्या मागण्या आजही प्रलंबित असून वेगवेगळ्या प्रकारच्या एकूण थकीत रक्कमेचा आकडा चार हजार कोटी रुपयांवर गेला असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले की, प्रत्येक कर्मचाऱ्यांला ही रक्कम विभागून द्यायची झाली तर हा आकडा सरासरी तीन लाख 77 हजार रुपये इतका होणार असून ही संपूर्ण रक्कम हडप करण्याचा डाव प्रशासनाने रचला असून ही रक्कम कधी मिळेल हे प्रशासनाने जाहीर करावे नाहीतर त्याचे गंभीर परिणाम होतील व आंदोलनाची व्याप्ती वाढेल व आंदोलन तीव्र होईल असेही बरगे यांनी या वेळी बोलताना सांगितले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 06, 2025 3:13 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
ST Bus Andolan: ऐन दिवाळीत प्रवाशांचे हाल! 13 ऑक्टोबरपासून एसटी कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, मागण्या काय?