एक मालिका अन् TV वरून गायब झाली अभिनेत्री, आता थाटायचाय संसार, पण या अटींवरच करणार लग्न

Last Updated:

Gauri Nalawade on Marriage : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आता लग्नासाठी तयार आहे. नुकतचं एका मुलाखतीत अभिनेत्रीने लग्न आणि होणार्‍या जोडीदाराबद्दलच्या अटी शेअर केल्या आहेत.

News18
News18
Gauri Nalawade : 'स्वप्नांच्या पलीकडले' या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेली वैदेही अर्थात अभिनेत्री गौरी नलावडे सध्या चर्चेत आहे. नुकतच एका मुलाखतीत अभिनेत्रीने लग्नासाठी तयार असल्याचं सांगितलं आहे. तसेच जोडीदार कसा हवा याबद्दलच्या आपल्या अपेक्षाही सांगितल्या आहेत. सालस, गुणी आणि नेहमी खरी बोलणारी वैदेही प्रत्यक्ष आयुष्यातही अगदी तशीच आहे. तसेच तिच्यासारखाच प्रामाणिक जोडीदार तिला आपल्या आयुष्यात हवा आहे. योग्य जोडीदार मिळाल्यानंतर ती लग्न करायला तयार आहे. स्वकर्तृत्वान, मेहनती, जिद्दी, ध्येयवादी, प्रामाणिक मुलगा गौरीला आपला जोडीदार म्हणून हवाय.
advertisement
लोकशाहीला दिलेल्या मुलाखतीत गौरी म्हणाली,"मी लग्नसाठी तयार आहे. योग्य जोडीदार मिळाल्यानंतर अर्थात मला लग्न करायचं आहे. प्रामाणिक, कर्तृत्वतावान मुलगा हवा आहे. मी माझ्या घरात जे पुरुष पाहिले आहेत ते स्वकर्तृत्वाने मोठे झालेले मी पाहिले आहेत. स्वत:च्या कर्तृत्वाने मोठी झालेली ध्येयवादी लोक कायम मला आवडतात. माणसं चुका करतात. आपण सगळेच चुका करतो. पण मला अप्रामाणिक माणसं आवडत नाहीत. मला ते कळतंही. त्यामुळे माझ्यासाठी प्रामाणिकपणा हा टॉप मोस्ट प्रायोरिटीवर आहे".
advertisement
गौरी पुढे म्हणाली,"प्रामाणिक माणसं खरं बोलणारी असतात. त्यांना खोटं बोलता येत नाही. त्यामुळे पुढचे सगळे वाद टळले जातात. आजवर खरं बोलण्याने माझ्या आयुष्यातील सर्व समस्या दूर झाल्या आहेत. मैत्रीण, आई, कामाच्या ठिकाणी मी कधीच कोणाला खोटी कारणं दिलेली नाहीत. आजपर्यंत कोणताही चित्रपट नाकारण्यासाठी मी कायम खरं बोलले आहे. त्यामुळे प्रामाणिक मुलगा असेल तर आमचं पटेल असं मला वाटतं. बाकी पैसावगैरे होत राहतं".
advertisement
माझा स्वामींवर विश्वास : गौरी नलावडे
गौरी नलावडे म्हणतेय,"माझा स्वामींवर विश्वास आहे. जेव्हा-जेव्हा मला एकटं वाटतं तेव्हा मी थेट अक्कलकोटला जाते. पूर्वी मला स्वामींची भीती वाटयची. मला कधीच अध्यात्मच्या आहारी जायचं नाही. स्वामींचा आशीर्वाद आहे. पण एखादी गोष्ट स्वामी करणार नाहीत तर मला स्वत:लाच करायची आहे".
advertisement
मराठी बातम्या/मनोरंजन/
एक मालिका अन् TV वरून गायब झाली अभिनेत्री, आता थाटायचाय संसार, पण या अटींवरच करणार लग्न
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement