Goregaon Mulund Link Road: गोरेगाव ते मुलुंड लिंक रोड सुस्साट, 75 मिनिटांचा प्रवास 25 मिनिटांपर्यंत; कसा असेल मार्ग?
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Bhavna Arvind Kamble
Last Updated:
Goregaon Mulund Link Road: गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पांतर्गत उभारण्यात येणाऱ्या दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरीदरम्यानच्या सहापदरी उड्डाणपुलाचे काम वेगाने सुरू आहे. एकूण ३१ खांबांपैकी २७ खांबांची उभारणी पूर्ण झाली असून उर्वरित चार खांबांचे काम रत्नागिरी जंक्शन येथे सुरू आहे. पुलाचे काम वेगाने सुरू असून १६ मे २०२६ पर्यंत हा उड्डाणपूल वाहतुकीस खुला करण्याचे उद्दिष्ट आहे.
गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पांतर्गत उभारण्यात येणाऱ्या दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरीदरम्यानच्या सहापदरी उड्डाणपुलाचे काम वेगाने सुरू आहे. एकूण ३१ खांबांपैकी २७ खांबांची उभारणी पूर्ण झाली असून उर्वरित चार खांबांचे काम रत्नागिरी जंक्शन येथे सुरू आहे. पुलाचे काम वेगाने सुरू असून १६ मे २०२६ पर्यंत हा उड्डाणपूल वाहतुकीस खुला करण्याचे उद्दिष्ट आहे.
पुलाची एकूण लांबी १,२६५ मीटर असून, बॉक्स गर्डर आणि काँक्रिटचा वापर करण्यात येत आहे. पुलाचे काम दोन टप्प्यांत विभागले असून एक टप्पा गोरेगाव बाजूचा आणि दुसरा मुलुंड बाजूचा आहे. पुलाची सुरुवात दिंडोशी न्यायालयाजवळून होते आणि तो रत्नागिरी जंक्शन येथे ९० अंशात वळतो तर शेवटी तो दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे उतरत असल्याचे नियोजन आहे. आतापर्यंत एकूण २६ पैकी १२ स्पॅनचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित १४ स्पॅन फेब्रुवारी २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत.
advertisement
या प्रकल्पात उड्डाणपुलासोबत एलिव्हेटेड रोटरी, पादचारी पूल आणि स्वयंचलित सरकते जिने यांचाही समावेश आहे. प्रकल्प चार टप्प्यांत राबवण्यात येत असून, सद्य:स्थितीत टप्पा ३ (अ) चे काम सुरू आहे. गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग हा मुंबईतील पूर्व-पश्चिम उपनगरांना जोडणारा चौथा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. सुमारे १२.२० किमी लांबीच्या या मार्गामुळे प्रवासाचा वेळ ७५ मिनिटांवरून २५ मिनिटांपर्यंत कमी होईल. त्यामुळे इंधन बचतीबरोबरच वाहतूक कोंडी कमी होणार असून मुंबईच्या वायू गुणवत्ता निर्देशांकातही सुधारणा होईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 06, 2025 2:44 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Goregaon Mulund Link Road: गोरेगाव ते मुलुंड लिंक रोड सुस्साट, 75 मिनिटांचा प्रवास 25 मिनिटांपर्यंत; कसा असेल मार्ग?