Aircross X चे डिझाइन आधीच्या मॉडेलसारखेच असेल. फक्त गाडीच्या मागच्या बाजूला एक नवीन X बॅज दिसेल. त्याचबरोबर कंपनी नवीन कलरचा पर्याय देऊ शकते. इंटीरियरबद्दल बोलायचं झाल्यास, यात नवीन अपहोल्स्ट्री (सीट कव्हर मटेरियल) आणि डॅशबोर्डवर काही छोटे बदल दिसू शकतं.
फिचर्स काय?
टीझरनुसार, नवीन Aircross X मध्ये क्रूझ कंट्रोल आणि नवीन अपहोल्स्ट्री असेल. याशिवाय, कंपनी यात वायरलेस चार्जिंग, ३६०-डिग्री कॅमेरा यांसारखे फिचर्स देऊ शकतं. टॉप व्हेरिएंटमध्ये कंपनी आपला खास Cara स्मार्ट AI असिस्टंट देईल, ज्यामुळे ड्रायव्हर व्हॉइस कमांड देऊन गाडीशी संबंधित माहिती आणि अनेक फिचर्स वापरू शकतील.
advertisement
सेफ्टीवर खास लक्ष
सुरक्षेच्या दृष्टीने कंपनी यात ६ एअरबॅग्ज, एबीएस (ABS) सोबत ईबीडी (EBD) आणि ईएसपी (ESP) सारखे फिचर्स प्रत्येक व्हेरिएंटमध्ये स्टँडर्ड म्हणून देईल. यामुळे ही गाडी फॅमिली कार म्हणून अधिक आकर्षक ठरू शकते.
इंजिन आणि पॉवर
Aircross X मध्ये कंपनी जुनेच पॉवरट्रेन (इंजिन) वापरेल. यात दोन इंजिनचे पर्याय मिळणार आहे. १.२-लीटर ३-सिलेंडर नैचुरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन, जे ५-स्पीड गिअरबॉक्ससह येईल. १.२-लीटर ३-सिलेंडर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन, जे ११०hp ची पॉवर देईल. यासोबत ६-स्पीड मॅन्युअल आणि ६-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्यायही मिळेल.
Citroen Aircross X अशा लोकांसाठी एक चांगला पर्याय ठरू शकते, ज्यांना स्टायलिश डिझाइनसोबत आधुनिक फिचर्स आणि सुरक्षा हवी आहे. येणाऱ्या काळात ही एसयूव्ही भारतातील मिड-रेंज एसयूव्ही सेगमेंटमध्ये चांगली स्पर्धा निर्माण करू शकते.