FASTag KYV म्हणजे काय?
FASTag KYV ही वाहन ओळखण्याची प्रक्रिया आहे. या प्रक्रियेअंतर्गत, वाहन मालकाने हे सिद्ध करावे लागेल की FASTag स्टिकर ज्या वाहनासाठी तो जारी केला होता त्यावर चिकटवलेला आहे. या व्हेरिफिकेशनसाठी कारचे नोंदणी प्रमाणपत्र आणि वाहनाचा फोटो अपलोड करणे आवश्यक आहे. या प्रक्रियेचा उद्देश फसवणूक रोखणे आहे, अशा प्रकरणांमध्ये विशेषतः व्यावसायिक वाहने इतर वाहन टॅगचा गैरवापर करतात.
advertisement
भारतातील सर्वात स्वस्त कार फक्त 50 हजारांत आणू शकता घरी! पाहा EMI किती येईल
खरंतर, जेव्हा ही प्रोसेस सुरू करण्यात आली तेव्हा अनेक खाजगी वाहन मालकांना अडचणींचा सामना करावा लागला. हे लक्षात घेऊन, NHAI ने आता काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत.
FASTag KYV मध्ये काय बदल झाले आहेत?
- आता पूर्वीसारखे अनेक फोटो अपलोड करण्याची आवश्यकता नाही. वाहन मालकांना फक्त समोरचा फोटो अपलोड करावा लागेल, ज्यामध्ये नंबर प्लेट आणि विंडशील्डवर लावलेला केलेला FASTag स्पष्टपणे दिसत असेल.
- जेव्हा तुम्ही तुमचा वाहन नंबर एंटर करता, तेव्हा सिस्टम आपोआप वाहन डेटाबेसमधून RC माहिती काढेल.
- कोणत्याही कारणास्तव KYV अपूर्ण असल्यास, FASTag आता त्वरित निष्क्रिय केला जाणार नाही.
- त्याऐवजी, NHAI प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वाहन मालकाला SMS रिमाइंडर पाठवेल.
- अनेक वाहनांचे एकाच मोबाइल नंबरवर FASTag रजिस्टर्ड असतील, तर मालक आता प्रथम कोणते वाहन पडताळायचे ते निवडू शकतो.
- शिवाय, कागदपत्रे अपलोड करण्यात समस्या येत असल्यास, संबंधित बँक ग्राहकांशी संपर्क साधेल आणि मदत करेल.
देशातील 5 सर्वात स्वस्त बाईक्स कोणत्या? किंमत 55 हजारांपासून सुरु, पाहा लिस्ट
FASTag KYV कसे करावे?
- प्रथम, [https://fastag.ihmcl.com] या वेबसाइटला भेट द्या.
- तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरने लॉगिन करा.
- तुमच्या वाहनाचा नंबर प्लेट आणि FASTag दर्शविणारा समोरचा फोटो अपलोड करा.
- RC माहिती आपोआप भरली जाईल. ती तपासा आणि सबमिट करा.
- तुमचा FASTag विंडशील्डला योग्यरित्या चिकटवला असेल आणि त्याचा गैरवापर होत नसेल, तर तो अॅक्टिव्ह राहील.
