धर्मेंद्र यांनी आजही कार जपून ठेवली आहे, अलीकडेच धर्मेंद यांनी सोशल मीडिया इंन्स्टाग्रामवर फियाटचा एक व्हिडीओ शेअर केला होता. धर्मेंद्र यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर फियाट ११०० चा व्हिडिओ पोस्ट केल होता. ही फियाट कार १९६० मध्ये खरेदी केली होती, त्यावेळी तिची किंमत फक्त १८,००० रुपये होते.
१९६० मध्ये १८,००० रुपये ही किंमत खूप मोठी होती. त्या काळामध्ये कारवर पैसे खर्च करणारे फार कमी होते. धर्मेंद्र यांनी ही कार कधी विकली नाही. एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं की, ही कार एक बॅकअप टॅक्सी म्ङणून ठेवली होती. त्यांना भीती होती की, एके दिवशी त्यांचे अभिनयाचे काम गमावलं जाईल. म्हणूनच, आर्थिक संकट टाळण्यासाठी त्यांनी त्यांची कार बॅकअप म्हणून ठेवली होती. जर त्यांच्या अभिनय कारकिर्दीत गोष्टी चांगल्या नव्हत्या तर ते बॅकअप टॅक्सी म्हणून वापरू शकतात, असा धर्मेंद्र यांचा प्लॅन होता.
फियाट 1100 चे फिचर्स
१९६० मध्ये फियाटने ११०० सेडान ४-सिलेंडर १,०८९ सीसी पेट्रोल इंजिनसह लाँच केली होती. ही कार ३६ बीएचपी इतकी पॉवर जनरेट करत होती. या कारमध्ये ४-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स होता. ही कार सध्या धर्मेंद्र यांच्या गॅरेजमध्ये आहे. वय जास्त झाल्यामुळे धर्मेंद्र गाडी चालवत नाहीत. पण त्यावेळी फियाट ११०० ही एक बेस्ट कार होती. धर्मेंद्र यांच्याकडे सध्या रेंज रोव्हर, मर्सिडीज-बेंझ SL 500 आणि मर्सिडीज-बेंझ S-क्लाससह इतर कार देखील आहेत.
