TRENDING:

नाद करतेय का? 186 BMW, Audi आणि मर्सिडीजची बुकिंग, 21,000,000 रुपयांचा डिस्काउंट, डील कशी झाली?

Last Updated:

या कार्समध्ये BMW, ऑडी आणि मर्सिडीज बेंझ सारख्या गाड्यांचा समावेश आहे. या कारची किंमत ६० ते १.४ कोटी रुपयांपर्यंत आहे. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सध्या कुणीही कार किंवा दुचाकी खरेदी करायलं गेलं तर हा प्रश्न नक्की विचारतो डिस्काउंट किती? आधीच जीएसटीच्या दरात कपात झाली आहे, त्यात दिवाळी आणि सण उत्सव असल्यामुळे वाहनांच्या किंमती कमी झाल्या आहेत. पण, या मंदीमध्ये जैन समाजाने संधी साधली आहे. एकाचवेळी 186 लक्झरी कार जैन समाजाने बूक केल्या. या जम्बो बुकिंगवर तब्बल २१ कोटी रुपयांचा डिस्काउंट मिळाला. या कार्समध्ये BMW, ऑडी आणि मर्सिडीज बेंझ सारख्या गाड्यांचा समावेश आहे. या कारची किंमत ६० ते १.४ कोटी रुपयांपर्यंत आहे.
News18
News18
advertisement

एकीकचं बळ काय असतं हे जैन समाजाने कार खरेदीतही दाखवून दिलं. जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (JITO) च्या सदस्यांनी एकत्रितपणे BMW, ऑडी आणि मर्सिडीज-बेंझसह गाड्यांची खरेदी केली. एकाच वेळी १८६ कारची ऑर्डर देण्यात आली. आता एकाच वेळी इतकी मोठी ऑर्डर आल्यामुळे कंपनी आणि डिलर्सने घसघशीत २१ कोटी रुपयांचा डिस्काउंट दिला. ही डील आतापर्यंतची सर्वात मोठी डील ठरली आहे.  JITO या  संस्थेचा हा करार सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.  देशभरातील १५ हून अधिक लक्झरी कार डीलर्सशी वाटाघाटी करून त्यांच्या सदस्यांसाठी विशेष सवलती मिळवल्या.

advertisement

हा "पहिलाच प्रकारचा करार" होता ज्यामध्ये JITO ला कोणताही नफा झाला नाही, असं संस्थेचे उपाध्यक्ष हिमांशू शाह यांनी सांगितलं. तसंच, शाह यांच्या मते, यापैकी बहुतेक कार गुजरातमधील जैन समुदायाच्या सदस्यांनी खरेदी केल्या होत्या. जानेवारी ते जून दरम्यान ही वाहनं खरेदीदारांना देण्यात आली. सरासरी, प्रत्येक सदस्याने ८ ते १७ लाख रुपयांची बचत केली, जी अनेक प्रकरणांमध्ये दुसरी कार खरेदी करण्याइतकीच होती. हा उपक्रम नितीन जैन नावाच्या सदस्याने सुरू केला होता.

advertisement

अशी सुचली आयडिया!

'काही JITO सदस्यांनी अशी कल्पना मांडली की जर त्यांनी सर्वांनी एकत्र कार खरेदी केल्या तर ते मोठ्या प्रमाणात ऑर्डर देऊ शकतो आणि चांगल्या सवलतींवर वाटाघाटी करू शकतो. हे डीलर्ससाठी देखील फायदेशीर ठरले, कारण त्यासाठी कोणतेही मार्केटिंग खर्च लागत नव्हता. या योजनेची बातमी पसरताच, देशभरातील JITO सदस्यांनी कार खरेदीसाठी पुढे आले.. अवघ्या काही महिन्यांतच, १८६ कारच्या ऑर्डर पूर्ण झाल्या, ज्यामुळे एकूण २१ कोटीची सूट मिळाली. २००७ मध्ये स्थापन झालेल्या JITO चे उद्दिष्ट देशभरातील जैन समुदायाच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणं आहे.

advertisement

ग्रुप सदस्य फी 2 ते 20 लाख

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हिवाळ्यात गाईचे तूप आरोग्यासाठी फायदेशीर, त्वचा राहील तजेलदार,आणखी हे फायदे पाहा
सर्व पहा

विविध व्यवसायांमध्ये कार्यरत असलेले ६५,००० हून अधिक सदस्य आहेत. संस्थेची आजीवन सदस्यता २,००,००० ते २,००,००० पर्यंत आहे, त्यानंतर सदस्य या ग्रुप डीलचा लाभ घेऊ शकतात. तीन वर्षांपूर्वी, JITO ने "J Point" नावाचे एक प्लॅटफॉर्म लाँच केलं होतं, जिथे सदस्य ग्रुप खरेदी आणि विशेष ऑफरबद्दल जाणून घेऊ शकतात. या प्लॅटफॉर्मने यापूर्वी आयफोनपासून ते लक्झरी कारपर्यंत प्रत्येक गोष्टीवर असंख्य ग्रुप डीलची सुविधा दिली आहे. "गेल्या काही महिन्यांत, आमच्या सदस्यांनी ५० लाख ते १.५ कोटी किमतीच्या सुमारे १९० लक्झरी कार खरेदी केल्या आहेत. या एकत्रित डीलमुळे २१.५ कोटींची सूट मिळाली आहे," असं जे पॉइंट प्लॅटफॉर्मचे अध्यक्ष नितीन जैन म्हणाले.

advertisement

मराठी बातम्या/ऑटो/
नाद करतेय का? 186 BMW, Audi आणि मर्सिडीजची बुकिंग, 21,000,000 रुपयांचा डिस्काउंट, डील कशी झाली?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल