या बॅटरीचे सर्वात मोठं फिचर म्हणजे तिचा चार्जिंग वेळ. edge574 ला 10 ते 80 टक्के चार्ज होण्यासाठी फक्त 12 मिनिटे लागतात. ही बॅटरी ElevenEs नावाच्या कंपनीने बनवली आहे आणि तिचा दावा आहे की, ही बॅटरी प्रत्येक 1 मिनिटाच्या चार्जिंगवर 66 किलोमीटर अंतर कापू शकते. याचा अर्थ असा की, ती चार्जिंगच्या प्रत्येक सेकंदाला एक किलोमीटर अंतर कापेल.पण, हे चार्जिंग 25 अंश सेंटीग्रेड म्हणजेच खोलीच्या तापमानावर केले पाहिजे. हा चार्जिंग मोड सध्या रस्त्यावर चालणाऱ्या कोणत्याही EV पेक्षा वेगवान आहे.
advertisement
बॅटरीसाठी तापमान महत्त्वाचं
या बॅटरीची कार्यक्षमता वाढवण्यात तापमान सर्वात महत्त्वाची भूमिका बजावते. खोलीच्या तापमानाला जरी तिची सर्वोत्तम कामगिरी दिसून येते, तरी ती १० अंश सेंटीग्रेडवरही चांगली कामगिरी करते. बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी फक्त १८ मिनिटं लागतात. जर ही बॅटरी १० अंशांवर चार्ज केली तर ती ४४ किलोमीटर प्रति मिनिट रेंज देते. तर ० अंशांवर चार्ज केली तर तुम्हाला २५ किलोमीटर प्रति मिनिट चार्जिंगची रेंज मिळेल. बॅटरी पूर्णपणे चार्ज केल्यावर ४१५ किलोवॅटची पॉवर देते.
लांबपल्ल्याच्या प्रवासाठी उत्तम बॅटरी
ElevenEs कंपनीची edge574 बॅटरी लांब ट्रिपसाठी बेस्ट पर्याय आहे. त्यात २१० सेल्सचा पॅक आहे, जो पूर्णपणे चार्ज झाल्यानंतर १ मेगावॅटची पॉवर देतो. ही बॅटरी केवळ मजबूत पॉवरच देत नाही तर तिची रेंज देखील खूप जास्त आहे. बॅटरी ५ लाख किलोमीटरपर्यंत वापरली जाऊ शकते, जी सध्याच्या इतर कोणत्याही बॅटरीपेक्षा खूपच जास्त आहे. ही बॅटरी कारच्या चेसिसमध्ये आरामात बसते आणि तापमान शून्यापेक्षा ३० अंश सेंटीग्रेड खाली आणि ६० अंशांपेक्षा जास्त असतानाच डिस्चार्ज होण्यास सुरुवात करते. ते ५५ अंश सेंटीग्रेडपर्यंतही सामान्य वीज देते. शून्यापेक्षा १० अंश कमी तापमानातही ते ७५ टक्के वीज देऊ शकते.