Magnus Grand ही Ampereमॅग्नस निओवर तयार केलेली आहे. मॅग्नस ग्रँडने बहुतेक डिझाइन फिचर्स कायम ठेवलं आहे. तसंच, ब्रँडने त्यांची नवीन फॅमिली स्कूटर दोन नवीन ड्युअल-टोन प्रीमियम रंगांसह अपडेट केली आहे - मॅचा ग्रीन आणि ओशन ब्लू - सोनेरी रंगाच्या बॅजिंगसह. ते मजबूत ग्रॅब रेल, सुधारित ब्रेकिंग तंत्रज्ञान, प्रशस्त आसन आणि वाढीव पेलोड क्षमतेसह देखील अपडेट केले आहे.
advertisement
बॅटरी, वॉरंटी आणि रेंज
Magnus Grand या अँपिअर मॅग्नस निओमध्ये २.३ किलोवॅट प्रति तास एलपीएफ बॅटरी आहे जी एका चार्जवर ८०-९५ किमी (इको मोड) ची रेंज देते. एलपीएफ बॅटरी ५ वर्षांची किंवा ७५,००० किमी वॉरंटीसह येते आणि प्रवासाच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलेली आहे. भारतात इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी झपाट्याने वाढत आहे.
गेल्या काही वर्षांत, अनेक कंपन्यांनी बाजारात इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केले आहेत. प्रमुख ब्रँड्स तसंच अनेक स्टार्टअप्सनी भारतीय बाजारात नवीन मॉडेल लाँच केले आहेत. परिणामी, भारत स्लो-स्पीड स्कूटरपासून मॅक्सी-स्कूटर आणि उच्च-कार्यक्षमता स्कूटरपर्यंत विविध पर्यायांची ऑफर देतो.
2000 रुपये EMI
या बाइकवर कंपनीने सध्या एक ऑफर दिली आहे. २० हजार रुपये डाऊन पेमेंट केलं तर महिन्याला फक्त २००० रुपये EMI येईल. एकूण फेडही ३६ महिन्यांसाठी असणार आहे. या ऑफरमध्ये फक्त 3,996 व्याज तुम्हाला द्यावं लागणार आहे.