जीएसटी 2.0 च्या नव्या कर रचनेमुळे ऑटो इंडस्ट्रीमध्ये बरेच बदल झाले आहे. आधी 28 टक्के जीएसटी आणि सेस आकारला जात होता आता रद्द करण्यात आला आहे. यापुढे मोठ्या वाहनांसाठी 40 टक्के जीएसटी स्लॅब आकारला जाणार आहे. जीएसटीमध्ये कर रचनेत बदल केल्यानंतर आता ऑडीने आपल्या कारच्या किंमती जाहीर केल्या आहेत.
Audi च्या कारमध्ये किती कपात झाली?
advertisement
Audi A4 – किंमत 48.89 लाख रुपये होती ती आता कमी करण्यात आली असून 46.25 लाख रुपये इतकी करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना जवळपास 2.64 लाख रुपये फायदा होईल.
Audi A6 – 67.38 लाख रुपये किंमत होती ती आता 63.74 लाख रुपये झाली आहे. त्यामुळे ग्राहकांची 3.64 लाख रुपयांची बचत होईल.
Audi Q3 – किमत 46.14 लाख रुपये आहे ती कमी करण्यात आली असून 43.07 लाख रुपये करण्यात आली आहे. यामध्ये जवळपास 3.07 लाख रुपयांचा फायदा होईल.
Audi Q5 – ची किंमत 63.75 लाख रुपये आहे, आता 68.30 लाख रुपये इतकी किंमत असणार आहे. जवळपास 4.55 लाख रुपयांची कपात झाली आहे.
Audi Q7 – किंमत 92.29 लाख रुपये होती, ती आता 86.14 लाख रुपये इतकी असणार आहे. त्यामुळे 6.15 लाख रुपयांची बचत होणार आहे.
Audi Q8 – फ्लॅगशिप एसयूव्हीला सगळ्यात जास्त फायदा होणार आहे. या एसयूव्हीची किंमत 1.17 कोटी रुपये आहे. आता 1.09 कोटी रुपये किंमत करण्यात आली आहे. जवळपास 7.83 लाख रुपये कमी करण्यात आले आहे.
सध्या भारतात सण उत्सवाचा काळ आहे, त्यामुळे वाहनांच्या विक्रीमध्ये चांगलीच वाढ होत असते. आता जीएसटी 2.0 नुसार किंमती कमी झाल्या आहेत. त्यामुळे वाहनांच्या विक्रीत विक्रमी वाढ होण्याची शक्यता आहे. आता लक्झरी कार उत्पादक कंपन्यांमध्ये स्पर्धा वाढण्याची शक्यता आहे. यामध्ये ऑडी, मर्सिडीज-बेंज आणि बीएमडब्ल्यूवर सुद्धा जीएसटीचा फायदा होणार आहे. ऑडी इंडियाने कारच्या किंमती जाणून घेण्यासाठी जवळील डिलरशीपवर भेट देण्याचं आवाहन केलं आहे. तसंच ऑडी कंपनीच्या साईटवरही किंमती पाहू शकतात.