TRENDING:

HSRP नंबर प्लेट अजुनही लावली नाही का? मग हे वाचाच, अन्यथा...

Last Updated:

High Security Number Plate : महाराष्ट्र सरकारने राज्यातील वाहनधारकांना हाय सिक्योरिटी नंबर प्लेट लावण्याच्या सुचना दिल्या आहेत. मात्र अद्यापही अनेकांनी एचएसआरपी नंबर प्लेट लावलेली नाही. त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची सूचना आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
High Security Number Plate Update : महाराष्ट्र सरकारने राज्यातील वाहनधारकांना एचएसआरपी नंबर प्लेट लावण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी वारंवार डेडलाइन वाढवलीही जात आहे. मात्र अद्यापही राज्यातील अनेक वाहनधारकांनी ही नंबर प्लेट आपल्या गाड्यांना बसवलेली नाही.
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

ज्या वाहनधारकांकडे जुने वाहन आहे. म्हणजेच 2019 पूर्वी नोंदणीकृत वाहन आहे त्यांना ही नंबर प्लेट लावणं अनिवार्य करण्यात आलं आहे.म्हणजेच महाराष्ट्र राज्य शासन नियमानुसार त्यांना 'हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट' लावणं बधनकारक असणार आहे.

advertisement

ही नंबर प्लेट लावण्यासाठी राज्य सरकारने एक कालमर्याता निश्चित केली होती. मात्र त्या काळात नंबर प्लेट लावण्यात आल्या नाही. यामुळे सरकारने वारंवार आपली डेडलाइन वाढवली आहे.

advertisement

अद्यापही असे अनेक वाहनं आहेत ज्यांना ही नंबर प्लेट बसवलेली नाही. 30 नोव्हेंबरपर्यंत वाहनधारकांना ही नंबर प्लेट बसवण्याची मुदत मिळालेली आहे. मात्र अजुनही अनेक वाहनधारक या तारखेकडे कानाडोळा करत आहेत.

advertisement

यामुळे आता तुमच्याकडे 45 दिवस शिल्लक आहेत. या काळात तुम्ही एचएसआरपी नंबर प्लेट बसवणं गरजेच आहे अन्यथा तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. यामुळे लवकरात लवकर एचएसआरपी नंबर प्लेटसाठी अर्ज करणं गरजेचं आहे. म्हणून वेळ वाया न घालवता लवकरात लवकर नंबर प्लेटसाठी अर्ज करा.

advertisement

HSRP न लावल्यास हाय होईल? : राज्य परिवहन विभागाने जारी केलेल्या माहितीनुसार ही नंबर प्लेट अत्यंत महत्त्वाची आहे. कारण ही नंबर प्लेट लावली नाही तर त्यांना RTO शी संबंधित कामांमध्ये अडचणी येतील. ज्यामुळे कर्ज नोंदणी, लायसेन्स नुतनीकरणांत आणि पत्ता बदलण्यास अडचणी येतील.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुणेकरांनो सावधान! तुमच्या फोटोचा कुणी गैरवापर तर करत नाही ना? नवा Scam समोर
सर्व पहा

हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट म्हणजे काय? ही एक विशेष प्रकारची नंबर प्लेट आहे. जी वाहनाच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. जी वाहन चोरी रोखण्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी डिझाइन करण्यात आली आहे.

मराठी बातम्या/ऑटो/
HSRP नंबर प्लेट अजुनही लावली नाही का? मग हे वाचाच, अन्यथा...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल