TRENDING:

BMW सारखा लूक, 19 मायलेज! Honda ची शान आता नव्या रंगात, किंमतही कमी

Last Updated:

Honda Cars India आपली थर्ड जेनरेशन असलेली Amaze कॉम्पॅक्ट सेडानचं ही Crystal Black Pearl कलरमध्ये लाँच केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
केंद्र सरकारने सध्या जीएसटीच्या कर रचनेत बदल केला आहे. त्यामुळे ऑटो इंडस्ट्रीमध्ये अनेक वाहनांच्या किंमतीत कपात झाली आहे. अशातच आता जपानी कंपनी  Honda Cars India आपली थर्ड जेनरेशन असलेली Amaze कॉम्पॅक्ट सेडानचं ही Crystal Black Pearl कलरमध्ये लाँच केली आहे. हा रंग सध्याच्या ऑप्शनमध्ये दाखल झाला आहे.
News18
News18
advertisement

Honda ने स्पष्ट केलंय की,   Crystal Black Pearl कलर स्किम “Honda Amaze ला स्टायलिश डिझाइनमध्ये एक बोल्ड आणि दमदार लूक देतोय. ही कार आता आणखी  प्रीमियम अपील आणि बोल्ड रोड प्रेजेंस दाखवतेय.

फिचर्स काय? 

Amaze मध्ये 8-इंच फ्लोटिंग टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम दिलं आहे. जे स्टॅण्डर्ड स्वरुपात अॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो साठी इनेबल आहे. 7-इंच सेमी-डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, रिअर एसी वेंट, वायरलेस चार्जर, पुश बटन स्टार्ट/स्टॉप, एअर प्युरिफायर,ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, वॉकअवे ऑटो लॉक, कनेक्टिविटी फिचर्स दिले आहे. हे सगळे डुअल-टोन इंटिरिअर्ससह येतात.

advertisement

इंजिन आणि मायलेज?

Amaze च्या इंजिनबद्दल बोलायचं झालं तर 1.2-लिटर चार-सिलेंडर आय-वीटीईसी पेट्रोल इंजन दिलं आहे. जे 89 बीएचपी इतकी पॉवर आमि 110 एनएम इतका पीक टॉर्क जनरेट करतो. यामध्ये एमटी आणि सीवीटीलाही जोडलं आहे. एमटीमध्ये 18.65 किमी प्रति लिटर इतकं मायलेज देते. तर सीवीटीमध्ये ही कार 19.46 किमी प्रति लिटर इतकं मायलेज देते. तसंच, ब्लॅक रंगाासह आता  Lunar Silver Metallic, Meteoroid Grey Metallic, Platinum White Pearl, Golden Brown Metallic, Radiant Red Metallic आणि Obsidian Blue Pearl या रंगाचाही समावेश झाला आहे. ही कार आता बाहेरून Honda Elevate SUV सह सर्व ३  ट्रिम्समध्ये लाँच केली आहे.

advertisement

Honda Amaze 2025 च्या बेस मॉडलची किंमत 8,09,900 रुपये एक्स शोरूम किंमत आहे. ऑन रोड किंमत ही कमी जास्त असू शकते. आता जीएसटीच्या दरात कपात झाली आहे. त्यामुळे किंमतीत आणखी फरक जाणवू शकतो. सध्या कंपनीने 77 हजारांची सवलत देण्यात आली आहे.

मराठी बातम्या/ऑटो/
BMW सारखा लूक, 19 मायलेज! Honda ची शान आता नव्या रंगात, किंमतही कमी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल