TRENDING:

HSRP नंबर प्लेट गाडीवर कशी लावायची? कार किंवा दुचाकी धारकांसाठी महत्त्वाची माहिती

Last Updated:

How to fix HSRP number plate on vehicle : ही प्रक्रिया कशी करायची, अजूनही लोकांना माहित नाही, चला जाणून घेऊ संपूर्ण माहिती.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : जर तुमच्याकडे कार किंवा दुचाकी आहे, तर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) लावणे आता अनिवार्य झालं आहं. सरकारने वाहतूक सुरक्षेसाठी हे नवीन नियम लागू केले आहे, जुनी नंबर प्लेट्स आता अमान्य ठरवण्यात येत आहेत. त्यामुळे जुनी गाडी असलेल्या वाहनचालकांनी तात्काळ HSRP लावणं गरजेचं आहे. (How to fix HSRP number plate on vehicle)
सोर्स : सोशल मीडिया
सोर्स : सोशल मीडिया
advertisement

ही प्रक्रिया कशी करायची, अजूनही लोकांना माहित नाही, चला जाणून घेऊ संपूर्ण माहिती.

HSRP नंबर प्लेट लावण्याची प्रक्रिया:

यासाठी दोन प्रक्रिया आहेत, एक ऑनलाइन आणि दुसरी ऑफलाइन

ऑफलाइन नोंदणी:

अधिकृत डीलरशी संपर्क करा (जसे की Hero, Honda, Maruti, Tata Motors, इ.) संबंधित डीलरशिपला भेट द्या आणि HSRP प्लेट लावण्याची विनंती करा. काही डीलरशिप्समध्ये HSRP फिटिंगसाठी स्वतंत्र विभाग असतो.

advertisement

यासाठी काही कागदपत्रांची पूर्तता करणं गरजेचं आहे. गाडीचा RC (नोंदणी प्रमाणपत्र), ओळखपत्राची छायांकित प्रत (आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स इ.) कागदपत्र द्या. गाडीचा विमा/इन्शुरन्स दस्तऐवज (काही ठिकाणी आवश्यक असतो). या नंतर शुल्क भरा.

ऑनलाइन नोंदणी:

सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटवर जा: www.bookmyhsrp.com

तिथे तुमच्या गाडीचा प्रकार (कार/बाईक), राज्य, RTO, गाडीचा नंबर आणि इतर माहिती भरा.

advertisement

नंतर आपल्या गाडीच्या प्रकारानुसार शुल्क भरा (बाईकसाठी साधारण ₹400 ते ₹500, कारसाठी ₹800 ते ₹1100).

अपॉइंटमेंट स्लिप डाउनलोड करा. आता हे लक्षात घ्या की तुम्ही ती स्वत: बसवू शकत नाही किंवा लोकली एखाद्या डिलरकडून बसवू शकत नाही.

तुम्हाला प्लेट बसवण्यासाठी किंवा त्याच्या फिटिंगसाठी शेड्यूल नक्की करावं लागेल. इथे तुम्हाला जवळचा फिटिंग सेंटर दिसेल आणि तुमची नंबर प्लेट फिटिंग करण्याचा स्लॉट मिळेल तो सिलेक्ट करा आणि तिथे त्या दिवशी तुमची गाडी घेऊन जा. त्या अधिकृत फिटिंग सेंटरवरच तुमच्या गाडीला नंबरप्लेट लावून मिळेल.

advertisement

फिटिंगनंतर तुम्हाला एक रिव्हेट केलेली प्लेट आणि एक स्टिकर मिळतो, जो गाडीला पुढे लावायचा असतो.

महत्त्वाची सूचना:

जर तुम्ही HSRP नंबर प्लेट लावली नसेल, तर वाहतूक पोलिसांकडून दंड होऊ शकतो.

काही राज्यांमध्ये कारवाई सुरु झाली आहे. त्यामुळे वेळेत ही प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक आहे.

HSRP सह "Colour Coded Fuel Sticker" सुद्धा अनिवार्य आहे (पेट्रोल, डिझेल, CNG ओळखण्यासाठी).

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शोरमा विकून महिन्याला किती कमाई होऊ शकते? प्रणयचं इन्कम पाहून तुम्ही कराल कौतुक!
सर्व पहा

HSRP नंबर प्लेट तुमच्या गाडीच्या सुरक्षिततेसाठी आणि कायदेशीर नियमांची पूर्तता करण्यासाठी अत्यावश्यक आहे. त्यामुळे वेळ वाया न घालवता आजच अधिकृत वेबसाईटवरून अपॉइंटमेंट घेऊन ही नंबर प्लेट लावून घ्या. यामुळे तुमचं वाहन सुरक्षित राहील आणि नियमभंगाचा दंडही वाचेल.

मराठी बातम्या/ऑटो/
HSRP नंबर प्लेट गाडीवर कशी लावायची? कार किंवा दुचाकी धारकांसाठी महत्त्वाची माहिती
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल